Gopichand Padlakar | आपल्या हुजरेगिरीला बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरताहेत? (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar) यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena leader and MP Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या हुजुरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरताहेत ? असं तर नाही ना की नारायण राणे (Narayan Rane) यांचा फुगा तुमच्या विषयीच्या गुपितानं भरलाय ? असा सवाल गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar) यांनी केला आहे. पडळकर यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून त्याद्वारे त्यांनी राऊतांवर टीकेचे बाण सोडले आहेत.

वरुण देसाईला का अटक केली नाही ?

पडळकर म्हणाले, असं तर नाही ना की नारायण राणे यांचा फुगा तुमच्या विषयीच्या गुपितानं भरलाय ? जो फुटला तर तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल. नारायण राणे यांच्यावरील सूडाची कारवाई ही कायद्याची कारवाई असं तुम्ही संबोधता. पण पोलिसांना आयाबहिणींवरुन शिव्या देणाऱ्या वरुण देसाई (Varun Desai) यांना अटक का नाही केली ? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल (Maharashtra model) ? असा प्रश्न पडळकरांनी केला आहे.

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला

ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी (Congress) विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचं (Sharad Pawar) मार्मिक शब्दांनी पितळ उघडं केलं, पण तुम्ही आज त्यांचाच उदोउदो करताय. बाळासहाबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसताय. हिंदू समाजाला सडलेला समाज म्हणणारा सर्जिल उस्मान (Sergil Usman) उजळ माथ्यानं महाराष्ट्रात फिरोतो. त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही. सत्तेच्या लालसेपोटी त्याच्यावर कारवाई करताना तुमचे हात थरथर कापतायत, असा आरोप पडळकर यांनी केला आहे.

‘सामना’चं रुपांतर ‘बाबरनामा’त

बाळासाहेबांच्या ‘दैनिक सामाना’च रुपांतर ‘दैनिक बाबरनामा’त करणाऱ्यांना मला हेच विचारायचे आहे की, त्यावेळी तुमची अस्मिता कोणाच्या पायापुढे लोटांगण घालते. कोणापुढे तुम्ही नतमस्तक होता. संजय राऊत कंबरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहिण्याच्या विकृतीला बांध घाला. अन्यथा तुमच्या हम करे सो कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील, असा टोला त्यांनी लगावला.

Web Titel :  Gopichand Padlakar | bjp-leader-gopichand-padlakar-slams-sanjay-raut-over-various-issues-saamna-editorial-balasaheb

हे देखील वाचा

Aadhaar Card मध्ये जन्म तारीख अपडेट करणे झाले आता आणखी सोपे,
केवळ फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात म्हशीने धडक दिल्याने आयटी इंजिनियरने केला थेट मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Earn Money | 2 रुपयांची ही नोट तुम्हाला रातोरात बनवू शकते लखपती,
जाणून घ्या कसे

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना आणखी एक मोठी भेट !
थेट खिशावर परिणाम, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा   तसेच LIVE VIDEO पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा