कसारा घाटात अंत्योदय एक्सप्रेस घसरली ; नाशिक – मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत

इगतपुरी : पोलीसनामा ऑनलाइन – कसारा इगतपुरी दरम्यानच्या कसारा घाटात गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेसच्या एका डब्याचे चाक घसरले असून नाशिक ते मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा अपघात पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी कसारा आणि इगतपुरी दरम्यानच्या घाटात घडला आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

मुंबई गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेसने कसारा रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर काही वेळाने एका पुलावर एक्सप्रेसच्या दुसऱ्या डब्याचे चाक रुळावरुन घसरले. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला आहे. पहाटे अंधार व घाटात असलेले धुके यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. या अपघातामुळे मुंबई ते नाशिक दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

train-mos_071819081102.jpg

मधली व अप लाईनवरुन पर्यायी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. अंत्योदय एक्सप्रेसचे घसरलेले चाक पुन्हा रुळावर आणण्याचे अवघड काम सध्या रेल्वेने हाती घेतली आहे. या सर्व अपघातात एक्सप्रेसमधील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

 घोरण्याच्या समस्येवर ‘या’ ६ घरगुती उपायांनी ‘कंट्रोल’ करा

बकरीच्या दुधाचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे, जाणून घ्या

नेहमीच आद्रक चहा पिणे योग्य नाही ; होऊ शकतो ‘हा’ त्रास

 ‘सीसी क्रीम’ म्हणजे काय ? याचा वापर केल्यामुळे होतात फायदे आणि नुकसान

 ‘हे’ फळं खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

 कच्ची पपई खाल्याने होतात ‘हे’ ३ फायदे, जाणून घ्या

Loading...
You might also like