‘या’ राज्यातील भाजप सरकार ’10 वी – 12 वी’ च्या विद्यार्थ्यांना दरमहा 2500 रूपये देणार, आणणार ‘इंटर्नशीप’ स्कीम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारकडून राज्यातील तरुणांना इंटर्नशिप प्रोग्रॅम अंतर्गत दर महिन्याला २५०० रुपये दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की सरकार यावर्षी एक नवीन इंटर्नशिप योजना घेऊन येणार आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक तरुणास दर महिन्याला २५०० रुपये देण्यात येतील.

मुख्यमंत्री म्हणाले की, हे पैसे विद्यार्थ्यांना मानधन तत्वावर दिले जातील. सीएम योगी यांनी गोरखपूर विद्यापीठातील पंडित दीन दयाल उपाध्याय येथे कामगार व सेवा नियोजन विभागाच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात बोलताना असे सांगितले. ते म्हणाले की, दहावी, बारावी आणि बीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक संस्था आणि उद्योगांशी जोडले जाईल.

सीएम ने सांगितले की सहा महिने आणि वर्षभर अशा दोन पद्धतीची ही इंटर्नशिप योजना असणार आहे. यामध्ये १५०० रुपये केंद्र सरकार आणि १००० रुपये राज्य सरकार देणार आहे. जेव्हा इंटर्नशिप पूर्ण होईल तेव्हा तरुणांना रोजगार देण्याची व्यवस्था देखील राज्य सरकारच करणार आहे. तसेच यासाठी एक मानव संसाधन सेल देखील बनवण्यात येईल असे सीएम यांनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले की पोलीस खात्यात २० टक्के मुलींची भरती करण्यात येईल. यामुळे राज्यातील संरक्षणात मुलींचे मोठे योगदान असेल. राज्यातील प्रत्येक तहसीलमध्ये आयटीआय आणि कौशल्य विकास केंद्र सुरू केले जाईल.