धक्‍कादायक ! मुलीनं प्रियकराशी संगणमत करून रचला स्वतःच्याच मृत्यूचा कट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे एका मुलीने आपल्या प्रियकरासोबत पळून जायचे म्हणून स्वतःच्याच मृत्यूचे खोटे नाटक रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोरखपूर मधील चौरीचौरा या ठिकाणी हा प्रकार ऐकून तुम्हाला एखाद्या चित्रपटाची कहाणी ऐकल्यासारखे वाटेल मात्र ही वस्तुस्थिती आहे.

काजल नामक मुलीचे हरिमोहन शर्मा नावाच्या मुलावर प्रेम होते मात्र वडिलांच्या सततच्या बोलण्याला कंटाळून तिने स्वतःच्याच मृत्यूचे खोटे नाटक रचल्याचे उघडकीस आले आहे.

तिचा प्रियकर एक शिक्षक म्हणून काम करतो त्याने सांगितले की, मुलीने स्वतःच्याच फोन वरून तिच्या वडिलांना व्हाट्सअँप रक्ताने माखलेले तिचे खोटे फोटो पाठवले आणि तिचे कोणीतरी अपहरण केले असल्याचे भासवले आणि स्वतःची हत्या झाल्याचे भासवून प्रियकरासोबत फरारी झाली.

चौरीचौरा पोलिस स्टेशन सुमित शुक्ला यांनी सांगितले की, 10 सप्टेंबर रोजी बालबुजुर्ग ओमनगर येथे राहणार्‍या शिक्षक अनिल कुमार पांडे यांची 23 वर्षीय मुलगी काजल पांडे ऑफिसला जात असल्याचे सांगून सकाळी 9 वाजता घरातून निघून गेली होती. यानंतर सकाळी 10:45 वाजता वडिलांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर अपहरण आणि खुनाचे फोटो आणि मेसेजेस आले. संदेश आणि फोटो पाहून अनिल यांना धक्काच बसला.

You might also like