काय सांगता ! होय, TV वर मालिका बघत बसलेल्या सासूने स्वयंपाक करण्यास दिला नकार, सूनेने थेट पोलिसांनाच घरी बोलावलं

पोलीसनामा ऑनलाईनः सासू- सूनेच्या वादाची एक हैराण करणारी घटना उत्तर प्रदेशातील मंझगांव (जि. गोरखपूर) येथून समोर आली आहे. जेवण बनविण्याच्या कारणावरून दोघीत वाद झाला. टीव्हीवर मालिका बघत असलेल्या सासूने जेवण बनविण्यास नकार दिला. त्यामुळे रोज शिळ अन्न खाऊन हैराण झालेल्या सुनेने थेट 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना घरी बोलावले. पोलिसांनी घरी येऊन दोघींची समजूत काढून वाद मिटवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघीचेही पती बाहेरगावी नोकरी करत असल्याने परिवारात सासू- सून दोघेच राहतात. दोघी सोबत राहत असल्याने त्यांच्यात नेहमीच किरकोळ गोष्टीवरून वाद होत असतात. सूनेने तक्रार केली होती की, तिला तिच्या सासूने दररोज शिळ जेवण देते. ज्यामुळे तिची तब्येत खराब होत आहे. तसेच सासू दिवसभर टीव्ही बघत बसते. तर सासूचा आरोप आहे की आपली सून खोटे बोलत आहे. ती सूनेला नेहमी गरम जेवण देते. सून कधीच स्वत:हून स्वयंपाक करत नाही. दिवसभर मोबाईलमध्ये बिझी राहते. पोलीस हजर असतानाही दोघींचे भांडण वाढले होते. पोलिसांनी दोघींनाही समजावून सांगून पुन्हा असे कराल तर कारवाई करण्यात येईल, असे बजावले आहे.