आता पायी चालल्यानं होणार स्मार्टफोन ‘चार्ज’, शाळकरी विद्यार्थ्यांनी शोधली नवी ‘टेक्नॉलॉजी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रोज नियमित चालल्याने तुम्ही निरोगी राहता असे अनेकदा डॉक्टर सांगतात मात्र आता चालल्याने तुमचा मोबाइल फोन देखील चार्ज होणार आहे. नववीच्या विद्यार्थ्यांनी याबाबतचा करिष्मा करून दाखवला आहे. मोबाईल ही सध्या काळजी गरज आहे मात्र त्याची बॅटरी संपल्यावर तुम्ही त्याचा वापर करू शकत नाहीत मात्र गोरखपूर येथील पिलर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी असा उपाय शोधला आहे ज्यामुळे तुमच्या निरोगी आरोग्यासोबत मोबाईल देखील चार्ज होणार आहे.

अशा प्रकारे होते काम
श्रृजन द्विवेदी, आर्य जायलवाल, अभियोजन प्रसाद आणि लक्ष्य प्रताप सिंह या चार विद्यार्थ्यांनी चालता चालता फोन चार्ज होईल अशी यंत्रणा निर्माण केली आहे. या विद्यार्थ्यांनी दोन इलेक्ट्रिक प्लेट, दोन बल्ब, बॅट्री आणि युसबी केबलच्या साहाय्याने हे उपकरण बनवले आहे विशेष म्हणजे हे सर्व बुटामध्ये फिट करण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही जितके चालणार तितका तुमचा फोन चार्ज होणार आहे.

दोन हजार रुपये आला खर्च
शाळेत विज्ञान प्रदर्शन होणार होते त्यामध्ये भाग घेण्यासाठी या विद्यार्थ्यांनी काहीतरी हटके बनवण्याचा विचार केला आणि त्यातून निर्माण झाली ही संकल्पना. गुगल वरून माहिती घेत चालताना मोबाइल चार्ज कसा होतो हे समजून घेतले आणि दोन हजार रुपये खर्च करून त्याची निर्मिती केली. शिक्षकांनी सांगितले की सध्या प्रायमरी तत्वावर याची निर्मिती करण्यात आलेली आहे नंतर अजून रिसर्च करून याला चांगला आकार देण्यात येईल. विशेष म्हणजे या उपकरणामुळे मोबाइल तर चार्ज होणारच आहे शिवाय चालल्यामुळे आरोग्य देखील निरोगी राहणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like