‘या’ महिन्यात वरुण चढणार बोहल्यावर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी रणवीर-दीपिका, प्रियांका-निक हे विवाहबंधनात अडकले आहेत. अनेक दिवसांपासून रणबीर आणि आलिायच्या लग्नाच्याही चर्चा सुरु होती. अनेकांना त्यांच्या विवाहाची उत्सुकता होती. यानंतर आता या सर्व चर्चा थंडावल्यानतंर वरुण धवनच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. वरूण धवन लवकरच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोहल्यावर चढणार आहे. नताशा दलाल असं त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे.

करण जोहरच्या चॅट शोमध्ये वरुण धवन सहभागी झाला होता. त्यावेळी या कार्यक्रमात करणशी गप्पा मारताना वरुणने त्याच्या नताशाबरोबरच्या नात्याला दुजोरा दिला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, वरूण आणि नताशा हे दोघेही डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. मु्ख्य म्हणजे या दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाची तयारीही सुरू केली आहे. लग्नाचे डेकोरेशन आणि सगळी तयारी नताशा तिच्या आवडीनुसार करणार आहे. नताशा सध्या तिच्या आणि वरुणच्या कपड्यांच्या खरेदीत व्यग्र आहे असेही समजत आहे.

वरुण आणि नताशा हे शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखतात. गेल्या काही वर्षांपासून वरुण आणि नताशा हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. आता लवकरच या अफेअरचे रुपांतर लग्नात होणार आहे. डिसेंबरमध्ये हे दोघेही लग्नगाठ बांधणार आहे. दरम्यान हे कोठे आणि कशा पद्धतीने लग्न करणार आहेत याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांसह सर्वांनाच आहे असे दिसत आहे.

ह्याही बातम्या वाचा –

गरज पडल्यास नारायण राणे शरद पवारांचे पाय धरतील : विनायक राऊत 

Video : मोदींवरील ‘त्या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल

बायोपिकनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला

फायद्यासाठी विखे कुठेही जातील : बाळासाहेब थोरात

राजू शेट्टी ‘बॅट’ घेऊन लोकसभेच्या मैदानात 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us