‘इन्कम टॅक्स’ची नोटीस ‘खरी’ की ‘खोटी’ हे ‘इथं’ तपासा अन् व्हा ‘टेन्शन फ्री’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्कमटॅक्स डिपार्टमेंटकडून मिळालेली नोटीस खरी आहे की खोटी हे तपासणे आता सोपे झाले आहे. त्यासाठी इन्कमटॅक्स डिपार्टमेंटकडून नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार विभागाने दिलेल्या प्रत्येक प्राप्तीकर सूचनेमध्ये कॉम्प्युटर जनरेटेड डॉक्युमेंट आइडेंटिफिकेशन नंबर (DIN) असेल. तसेच नव्या निर्णयाअंतर्गत आता करदात्यांना प्राप्त केलेल्या सर्व कागदपत्रांवर हा नंबर आवश्यक झाला आहे. ही सिस्टीम कर प्रशासनात अधिक जबाबदारी आणि पारदर्शकता सुनिश्चित करेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) देखील याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे.

CBDT च्या सूचनेनुसार, इन्कमटॅक्स डिपार्टमेंटशिवाय DIN शिवाय जारी केलेली सर्व कागदपत्रे आणि पत्रव्यवहार विशेष परिस्थितीत वगळता अवैध मानले जाईल. ज्या परिस्थितीचा विचार केला जाणार नाही अशा स्थितीत केवळ DIN लागू करणे आवश्यक नाही. परंतु त्यासाठी आयकर आयुक्त किंवा आयकर महासंचालक यांच्याकडून मान्यता घ्यावी लागेल.

1 ऑक्टोबर 2019 नंतर जारी केलेल्या नोटिस किंवा ऑर्डरवर DIN प्रिंट केले जाईल. 1 ऑक्टोबर 2019 पूर्वी जारी केलेल्या नोटिस किंवा ऑर्डर 31 ऑक्टोबर, 2019 पर्यंत अपलोड केल्या जातील.

जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

स्टेप-1
प्रथम www.incometaxindiaefiling.gov.in वर जा.

स्टेप-2
‘क्विक लिंक्स’ टॅब अंतर्गत तुम्हाला ‘आयटीडीद्वारे नोटीस / ऑर्डर देणे’ दिसेल. त्यावर क्लिक करा

स्टेप-3
आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर एक नवीन वेबपेज ओपन होईल. मिळालेले डॉक्युमेंट तपासण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिले जातील. डॉक्युमेंट नंबर किंवा पॅन, मूल्यांकन वर्ष, नोटिस विभाग, महिना, जारी होण्याचे वर्ष याद्वारे दस्तऐवजाचे सत्य शोधू शकता.

स्टेप-4
कॅप्चा क्रमांक आणि सबमिटवर क्लिक करा. जारी केलेली नोटीस किंवा ऑर्डर खरी असेल तर ती वेबसाइटवर दिसून येईल. आपल्याला वेबसाइटवर येस, नोटिस इज व्हॅलिड अ‍ॅण्ड इश्यूड बाय इनकम टॅक्स अथॉरिटी हा मेसेज दिसेल.

बर्‍याच वेळा असे निदर्शनास येते की कागदपत्रे पाहून ती प्रत्यक्षात कोणी दिली हे कळत नाही. म्हणूनच ही नवीन प्रणाली तयार केली जात आहे ज्याद्वारे प्रामाणिक करदात्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये.

Visit : Policenama.com