पोलिसांच्या गाडीत घुसून बकरीने खाल्ले महत्त्वाचे कागदपत्रे, पहा व्हिडीओ

पोलिसनामा ऑनलाईन – बकरी आणि खाणे हे समीकरण असल्याचे बोलले जाते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका पोलीस अधिकार्‍याच्या गाडीत बकरीने उडी मारून महत्त्वाचे कागदपत्र खाल्ल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील एका पोलिस अधिकार्‍याने जेव्हा गाडीचा दरवाजा उघडली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. त्यांना गाडीत बसलेली एक बकरी दिसली. या बकरीने काही महत्त्वाची कागदपत्रही खाल्ली असल्याचे त्यांना दिसून आले. अधिकार्‍याने बकरीला खाली हाकलण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र बकरी काही ऐकायला तयार नव्हती. संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पोलीस अधिकारी जेव्हा गाडीतून बाहेर पडला त्यावेळी बकरी आतमध्ये शिरली. त्यानंतर तिने पेपर खायला सुरुवात केली. हा व्हिडीओ 4 सप्टेंबरला फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे.