सरकारी कर्मचार्‍यांसाठी महत्वाची बातमी ! ऑफीसला येवु न शकणार्‍या कर्मचार्‍यांना सरकारनं दिली ‘ही’ सूट

पोलसनामा ऑनलाइन: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळं बंद असल्यामुळे कर्मचाऱ्यांना ऑफिसला येण्यास बरेच कष्ट घ्यावं लागत आहे. यासाठीच जे कर्मचारी ऑफिसला येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी नियमात थोडी ढिलाई केली आहे. हा आदेश सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने( (DoPT Department of Personnel and Training under the Personnel Ministry) काढला आहे.

हा नियम ऑफिसला न येणाऱ्यांसाठी तसेच जे सुट्टीवर आहेत त्यांच्यासाठी लागू आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांनी ऑफिसला न येण्याचं कारण कोरोनामूळे बंद असणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दिलं आहे. मंगळवारी दिलेल्या कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार, 25 मार्चपासून ऑफिसला ना आलेल्यानंही या निर्णयाचा फायदा मिळेल.

तसेच आरोग्याच्या कारणाने सुट्टीवर असणाऱ्यांनाही याचा फायदा मिळू शकेल. पण यासाठी त्यांना मेडिकल सर्टिफिकेट जमा करावे लागेल.