वीज बिलामार्फत सरकार करतंय जहिरात , निवडणूक आयोगाने कारवाई करावी’ : धनंजय मुंडे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फसवणूक करण्यात हे सरकार माहीर असल्याचे तर जगजाहीर आहे. या बहाद्दरांनी निवडणूक आयोगालाच फसवण्याचा घाट घातला आहे , अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली पण आहे . केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर त्यांनी निशाणा साधला आहे . आचारसंहिता लागू असतानाही वीज बिलाच्यामाध्यमातून सरकारी जाहिरात करत सरकार लोकांच्या घरात घुसखोरी करत आहेत असे त्यांनी म्हटले आहे. शिवाय निवडणूक आयोगाने यावर तात्काळ कारवाई करायला हवी अशी मागणीही त्यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.   
काही दिवसांपू्र्वी निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या यानंतर आचारसंहिताही लागू केली आहे. असे असतानाही सरकार वीज बिलावर जाहिरातबाजी करत घराघरात घुसखोरी करत आहे असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ट्विट करत त्यांनी हा मुद्दा मांडला आहे. इतकेच नाही तर, निवडणूक आयोगाने सरकारच्या या जाहिरातबाजीवर कारवाई करावी अशी मागणीही केली आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी वीज बिलचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यावर सरकारच्या योजनेची माहिती आहे. शिवाय त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे फोटो आहेत. माझी कन्या भाग्यश्री या योजनेची माहिती दिली आहे. दरम्यान आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे म्हणतात, “फसवणूक करण्यात हे सरकार माहीर असल्याचे तर जगजाहीर आहे. पण या बहाद्दरांनी निवडणूक आयोगालाच फसवण्याचा घाट घातला आहे. आचारसंहिता लागू असतानाही थेट लोकांच्या वीज बिलावरच सरकारी जाहिरात करत घराघरात घुसखोरी करत आहेत. सरकारची ही ‘घरघर’ थांबवण्यासाठी निवडणूक आयोगाने तात्काळ कारवाई करावी.” अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे.