YES बँकेवर सरकार आणि RBI नं केली वेगानं कारवाई, जाणून घ्या काय होणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पीएमसी बँकेनंतर आता एस बँकेने सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढवल्या आहेत. परंतु या संपूर्ण प्रकरणावर सरकार आणि आरबीआयने कारवाईला वेग दिला आहे. दरम्यान, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माध्यमांना या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की आम्ही ही मर्यादा 30 दिवसांसाठी लागू केली आहे. एस बँकला संकटातून बाहेर काढण्यासाठी लवकरच रिझर्व्ह बँक त्वरित कारवाई करेल. आरबीआय गव्हर्नर म्हणाले, बँकेला वेळ द्यावा लागेल, व्यवस्थापनाने आवश्यक ती पावले उचलण्यासाठी प्रयत्न करायला हवा. जेव्हा आम्हाला आढळले की हा प्रयत्न कार्य करीत नाही, तेव्हा आरबीआयने हस्तक्षेप केला.

मुख्य आर्थिक सल्लागार केके सुब्रमण्यम यांनी सांगितले आहे की, सरकार आणि आरबीआय योग्य तोडगा काढण्यासाठी एकत्र काम करत आहेत. एस बँकेवरील सेंट्रल बँकेच्या मोरेटोरियमच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरबीआय एस बँकेच्या नवीन योजनेवर काम करत आहे. ही संध्याकाळपर्यंत तयार होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर हे मंत्रिमंडळात पाठवले जाईल. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही योजना लागू केली जाईल.

5 मार्च रोजी, आरबीआयने आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या खासगी क्षेत्रातील एस बँकेचे संचालक मंडळ भंग करत आणि त्यावर प्रशासक नेमले. याद्वारे बँकेने ठेवीदारांवर पैसे काढण्याचा निर्णयही घेतला. पुढील आदेश होईपर्यंत आरबीआयने बँकेच्या ग्राहकांना पैसे काढण्याची मर्यादा 50,000 रुपये ठेवली आहे. सध्या ही बंदी 5 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत सुरू राहणार आहे. एसबीआयच्या नेतृत्वात बँकेचे नियंत्रण वित्तीय संस्थांच्या गटाकडे सोपविण्याची तयारी सुरू झाली आहे.

आरबीआयने सायंकाळी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले की, एस बँकेचे संचालक मंडळ तत्काळ प्रभावाने भंग करण्यात आले आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) माजी मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) प्रशांत कुमार यांची एस बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.