Pension Scheme : कोरोनाने जीव गमावणार्‍या कर्त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मिळणार ‘पेन्शन’, मोदी सरकारकडून अनेक सुविधांची घोषणा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शनिवारी कोविड-19 (Covid-19) मुळे जीव गमावणार्‍यांच्या अलंबितांना पेन्शन (Pension Scheme)  देण्यासह अनेक इतर सुविधा प्रदान करण्याची घोषणा केली. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) जारी एका वक्तव्यात म्हटले आहे की, अवलंबितांसाठी पेन्शनसह सरकार कोविड-19  (Covid-19) ने प्रभावित कुटुंबियांना वाढलेली, उदारीकृत विमा (Pension Scheme)  भरपाई देईल.

 

 

महाग क्रीमने नाही तर घरातील तेलाने स्ट्रेच मार्क्स घालवा, जाणून घ्या

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी म्हटले की, या पावलांमुळे आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या कुटुंबियांच्या समस्या कमी होतील. सरकार कोविड-19 (Covid-19) पीडित कुटुंबियांसोबत उभे आहे. अशा पीडित कुटुंबाला सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) ची पेन्शन योजना (Pension Scheme) त्यांच्यासाठी सुद्धा विस्तारीत केली जात आहे, ज्यांचा मृत्यू महामारीमुळे झाला आहे.

अशा पीडित कुटुंबाच्या अवलंबित सदस्यांना सरासरी दैनिक वेतनाच्या 90 टक्केच्या बरोबरीने पेन्शन (Pension Scheme) मिळेल. वक्तव्यात म्हटले की, हा लाभ मागील वर्ष 24 मार्चपासून प्रभावी होईल आणि यामध्ये 24 मार्च 2022 पर्यंतची प्रकरणे असतील.

पीएमओने (PMO) म्हटले की, इम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इंश्युरन्स (ईडीएलआय) योजनेंतर्गत मिळणार्‍या लाभांचा विस्तार केला गेल्याने त्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना लाभ मिळेल ज्यांनी महामारीमुळे आपला जीव गमावला आहे.

विम्याच्या लाभांतर्गत मिळणारी सर्वाधिक रक्कम सहा लाखांवरून सात लाख केली आहे. तर किमान रक्कम 2.5 लाख रुपये असेल. ही योजना 15 फेब्रुवारी 2020पासून पुढील तीन वर्षासाठी लागू राहील.

 

Also Read This : 

 

 

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

 

केवळ इम्यूनिटी मजबूतच नव्हे तर केस गळती देखील थांबते पांढर्‍या कांद्याच्या सेवनामुळं, जाणून घ्या हैराण करणारे फायदे

 

जाणून घ्या कोण-कोणत्या स्थितीत एक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्यासाठी ठरू शकते ‘लाभदायक’ !

 

 

पायांचे दुखणे दुलर्क्ष करू नका, मोठया आजाराचे संकेत, जाणून घ्या

 

Pravin Darekar : ‘उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी, शरद पवार यांनी त्यांच्या हाताखाली काम करावं’

 

 

जाणून घ्या ‘चम्पी’ करण्याची पध्दत, केस होतील ‘लांब’ अन् ‘दाट’, जाणून घ्या

 

चांगल्या आरोग्यासाठी गरजेच्या आहेत डाळी, ब्लडप्रेशर पासून मधुमेहापर्यंतच्या धोक्यांना करतात कमी, जाणून घ्या