शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थीनीची आत्महत्या ; परस्पर मृतदेह रुग्णालयात 

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – ठाण्यातील अघई येथील शासकीय आश्रमशाळेमधील आठवीच्या वर्गातील विद्यार्थीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.दिपाली वांगड असे या मृत मुलीचे नाव आहे.दरम्यान, सदर मुलीच्या पालकांना न कळवताच तसेच पोलीस पंचनामा न करता अधिक्षिका विजया निपुर्ते यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
दिपीली ही अघई परिसरातील जांभुळपाडा येथील असल्याचे समजते. काल संध्याकाळी सातच्या सुमारास जेवण आटोपल्यानंतर हजेरी घेत असताना दीपाली उपस्थित न दिसल्याने तिचा शोध घेण्यात आला. शोध घेतल्यानंतर वसतीगृहातील खोलीत तिने गळफास घेतल्याचे दिसून आले. अशी माहिती मुख्याध्यापक रमेश तिक्ते यांनी दिली.परस्पर मृतदेह रुग्णालयात नेण्यात आल्याने पालकांमध्ये संशय आहे. त्यामुळे आश्रम शाळेतील निवासी कर्मचारी व शिक्षक यांची चौकशी  करण्याची मागणी करण्यात येत आहे.