मोदी सरकारचा ‘मास्टरप्लॅन’ ! ‘या’ तंत्रज्ञानाव्दारे वाहनांच्या चोर्‍या थांबविणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात वाहन चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भारत सरकारने नवीन योजना आणली आहे. गाड्या चोरी न होण्यासाठी तयार होऊन येणाऱ्या नवीन गाड्यांवर हे तंत्रज्ञान बसवले जणार आहे. यापुढे बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या नवीन गाड्या अदृश्य मायक्रोडॉट्स सह येणार आहेत. यामुळे वाहन चोरी आणि वाहनांचे सुटे भाग चोरी होण्यापासून वाचणार आहेत. मोटार वाहन नियम कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने सोमवारी एक नवीन अधिसूचना जारी केली. यामध्ये हि घोषणा करण्यात आली आहे.

सरकार का मास्टरप्लान, इस खास तकनीक से रोकी जाएंगी गाड़ियों की चोरियां

अल्ट्राव्हायोलेट प्रकाशात दिसणार फक्त डॉट्स

हे अदृश्य मायक्रोडॉट्स तुम्हाला फक्त अल्ट्राव्हायोलेट प्रकाशात दिसणार असून सध्या प्रकाशात तुम्ही हे पाहू शकणार नाही. याध्ये एक युनिक नंबर असणार आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनावर हा नंबर असल्याने कुणीही वाहन चोरीची हिम्मत करणार नाही. या तंत्रज्ञानाद्वारे तुमच्या वाहनाच्या भागांवर अदृश्य प्रकारचे डॉट्स असतात, यामुळे तुमच्या वाहनाला वेगळी ओळख देतात.

वाहन मंत्रालयाने या सूचनांवर ३० दिवसांच्या आत यावरील काही तक्रारी तसेच सूचना मागवल्या आहेत. त्याचबरोबर काही सुधारणा असतील तर त्या देखील पाठवण्याची विनंती केली आहे. त्यामुळे जर हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात उतरले तर चोरांना गाडी चोरताना दहा वेळा विचार करावा लागेल. त्यामुळे यापुढे तुमचे वाहन चोरी झाल्यास तुम्हाला तसेच पोलिसांना ते सापडणे सोपे होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –