मोदी सरकारनं औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर आणली बंदी, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाइन पद्धतीने औषधे विकत घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ( DCGI ) ने ज्यांच्याकडे परवाना नाही अशा व्यक्तींना ऑनलाइन पद्धतीने औषधे विकण्यास मनाई केली आहे. ऑनलाइन विक्रीवरील बंदीचा आदेश सर्व राज्यांमध्ये पाठवण्यात आलेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जोपर्यंत ई – फार्मेसीज बाबतचे नियम – कायदे यांचा ड्राफ्ट तयार होत नाही आणि त्याची अमलबजावणी सुरु होत नाही तोपर्यंत याबाबत ई – फार्मेसीजचे सरकारसोबत रजिस्ट्रेशन केले जावे आणि डॉक्टर व रुग्णांना देण्यात येणाऱ्या प्रिस्क्रिप्शनची नोंद ठेवण्यात यावी. वेबसाइटने सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गेनाइजेशन ( CDSCO ) ने सध्या औषधांबाबतच्या नियम आणि कायद्यांवर सध्या काम सुरु असल्याचे सांगितले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

DCGI चे हेड वी.जी सोमानी यांनी 28 नोव्हेंबर रोजी एक पत्र लिहून आदेश दिला की, त्यांच्या या निर्णयामुळे या क्षेत्रात पैसे लावणारे सध्या चांगल्याच अडचणीत सापडले आहेत. DCGI ने 12 डिसेंबर, 2018 ला दिल्ली उच्च न्यायालयाची आठवण करून दिली आहे, न्यायालायने दिलेल्या आदेशात म्हंटले होते की, औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर बंदी आणायला पाहिजे कारण ई – फॉर्मेसीज कडे याबाबत कोणताच परवाना नाही त्यामुळे औषध कायद्याचे उल्लंघन होत आहे.

Visit : Policenama.com