‘त्या’ सर्व बँकांना मोदी २.० सरकारचा मोठा दिलासा, सरकार 30 हजार कोटींचे ‘भांडवल’ देणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वजनिक बँकांना दिलासा देण्यासाठी सरकार नव्याने मांडत असलेल्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करु शकते. अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन पब्लिक सेक्टर बँकांसाठी जवळपास 30 हजार कोटी रुपयांचे वाटप करण्याची घोषणा करु शकते. जेणेकरुन नियमानुसार किमान भांडवलीची गरज बँकां पुर्ण करु शकतील.

बँकांची परिस्थिती सुधारण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना फंडाचे वाटप करु शकते. हे अत्यंत आवश्यक आहे. बुडालेली कर्ज, डिफॉल्टची प्रकरणे आणि रोख पैशाचे संकट यामुळे बँका समस्येत अडकल्या आहेत.

मागील आठवड्यात सीतारामन यांनी वित्तीय क्षेत्रातील आणि भांडवली बाजारातील प्रमुख लोकांशी चर्चा केली आहे. यात रिझर्व बँकेची उप गव्हर्नरर एन.एस. विश्वनाथन देखील सहभागी होते. एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकी गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांना एक समर्पित रोख रक्कम व्यवस्था, छोट्या बचतीच्या योजना यासाठी व्याज दर आणि बँकांच्या अडकून राहिलेल्या एनपीएवर चर्चा करण्यात आली.
वित्त मंत्रालयानुसार, या बैठकीत सार्वजनिक बँकांचा भांडवली प्रवाह आणि एक वेगळा बॉन्ड एक्सचेंज बवण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली.

आरबीआयच्या आकडेवारी नुसार, बँकांच्या क्रेडिटमध्ये 14.88 टक्के वृद्धि झाली आहे. पंतप्रधान मोदींनी मागील आठवड्यात आर्थिक विकास आणि रोजगार वाढवण्याच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी दोन मंत्रिमंडळ समित्यांची नियुक्ती केली होती.

आरोग्य विषयक वृत्त-
बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’, ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’साठी देखील फायदाच
#YogaDay2019 : नियमित योगा करा…आणि स्मरणशक्ती वाढवा
#YogaDay2019 : मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे ‘मुद्रासन’