लालबागच्या राजाचे नियंत्रण सरकारच्या हाती ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई  येथील लालबागचा राजाच्या दर्शनासाठी खूप गर्दी होते. यावेळी भक्तांना नीट दर्शन देखील घेऊ दिले जात नाही काही क्षणातच भक्तांना पुढे ढकलले जाते या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच आयपीएस आधिकाऱ्यासोबत धक्काबुक्की आणि अरेरावी करण्याचा प्रकार झाला. त्यानंतर या संतापजनक प्रकाराबाबत अनेक प्रक्षोभक प्रतिक्रिया उमटल्या . या प्रकरणाची दखल घेत त्याची चौकशी करण्यासाठी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी लालबागच्या राजाच्या मंदिरात पाहणी केली .

डिगे काल आयपीएस अधिकाऱ्यासोबत केलेल्या धक्काबुक्की आणि अरेरावी केल्याप्रकरणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे चौकशी केली. लागलीच आयुक्तांनी घेतलेल्या या दखलीमुळे लालबागचा राजा मंडळावर सरकारचे तर नियंत्रण येणार नाही ना ? असा सवाल निर्माण झाला आहे. धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार ,ते म्हणाले,” मी मंडळात जाऊन लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांच्याशी काल घडलेल्या प्रकारची चौकशी केली. तसेच व्हीआयपी व्यक्तींच्या दर्शनाच्या रांगेची पाहणी केली असून कालच्या सारखा प्रकार घडू नये यासाठी काळजी घ्या असे सांगितले”. सचिव साळवी यांनी कालचे प्रकरण मिटले असून पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याची ग्वाही दिली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’94dfc7ac-bc02-11e8-9802-151a1e42117d’]
या मंडळाच्या सुरक्षेसाठी दरवर्षी राज्य सरकारचे गणेशोत्सवादरम्यान लाखो रुपये खर्च होतात. तसेच या मंडळात कार्यकर्त्यांची वाढलेली मुजोरी पाहता समाजातून या मंडळावर सरकारचे नियंत्रण असावे अशा चर्चांना गेल्या अनेक वर्षांपासून उधाण आले आहे. मात्र, या मंडळात दरवर्षी होणारी दादागिरीला लगाम लावण्यासाठी राज्य सरकार महत्वाचे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8a59af61-bc02-11e8-913d-710ed12796b0′]