लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यास केंद्राचा नकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. लिंगायत आणि वीरशैव हे हिंदू धर्माचाच भाग असल्याचे सांगत स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यास नकार दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी डिसेंबर २०१८ मध्ये लोकसभेत नियम ३७७ नुसार लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा प्रश्न उपस्थित केला होता.

लिंगायत धर्माचा स्वतंत्र ध्वज, धर्मग्रंथ आहे. या धर्माची स्थापना महात्मा बसवेश्वरांनी केली आहे. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा यासाठी देशातील लिंगायत समाज रस्त्यावर उतले आहेत. त्यांना स्वतंत्र धर्माची मागणी करण्याचा कायद्याने अधिकार आहे. अशी मागणी राजू शेट्टी यांनी लोकसभेत केली होती.

गृह विभागीतील सहसचिव एस.सी.एल. दास यांनी २ जुलै २०१९ रोजी राजू शेट्टी यांना पत्र पाठवून उत्तर दिले आहे. या पत्रामध्ये केंद्र सरकारने लिंगायत धर्मास स्वतंत्र दर्जा देण्यास असमर्थता दर्शवली असल्याचे म्हटले आहे. केंद्राने स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यास नकार दिल्याने या समाजावर अन्याय असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर