सरकार निर्णय घेत नाही पंचाग बघुन मुहूर्त पहात आहे

पाथरी : पाेलीसनामा ऑनलाईन-शेख सिकंदर – महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस संघर्ष  यात्रेची बैठक परभणी जिल्ह्यात दोन ठिकाणी सोमवार (दि 29 ) रोजी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आली होती. परभणी व पाथरी शहरात सभेला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. पाथरी येथील जिल्हा परिषद प्रशाला मैदानावर आयोजित सभेत बोलताना महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

यावेळी मंचावर माजी खा. तुकाराम रेंगे, माजी आ. सुरेश देशमुख, सभापती समशेर वरपूडकर, प्रभाकर शिंदे, विश्वनाथ थोरे, अली अफसर अन्सारी, माजी नगराध्यक्षा जयश्रीताई खोबे, बालकिशन चांडक, प्रेरणा वरपूडकर, जि.प.सदस्य बाबुराव नागेश्वर, दिनकर रणेर, आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंचावर युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजीव सातव, विधानसभेचे उप विरोधी नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे आमदार डॉ.  वजाहत खान, माजी मंत्री तथा काॅ.जि अ.  सुरेश वरपूडकर  आदींनी सभेला संबधीत केले. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर चौफेर टीका केली पुढे बोलतांना खासदार अशोक  चव्हाण यांनी सांगितले की जायकवाडी धरणाला निकामी करण्याचे कट कारस्थान केल्या जात आहे. उत्तर महाराष्ट्राचे मंत्री मंडळ मराठवाड्यावर अन्याय करीत आहे.

मराठवाड्यातील शेतकरी नेते गप्प का ?
आमच्या वाड्याचे पाणी पुर्ण मिळाले पाहिजे पाणी सोडण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला तर विलंब का होत आहे ? असा प्रश्न केला, हा जो दुष्काळ निर्माण झाला आहे तो सरकार निर्मित आहे यांना मानसांच्या मनाची संवेदना कळत नाहीये पडलेला दुष्काळ पाहण्यास राञी जात आहेत व मोबाइल फोनचे टॉर्च लावून पहात असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्ज माफी झाली तर कोणाला कर्ज माफी मिळाली हे सरकार निर्णय घेत नाही पंचाग बघुन मुहूर्त पहात आहे का ?

शेतमालाला आधारभूत किंमत देण्याची घोषणा केली परंतु खरेदी केंद्र सुरू नाही छञपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भुमिपुजन होऊन कित्येक वर्षे झाली तरी काम कधी होणार असल्याचे सांगितले. रा.स्व.से. संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांच्यावर टिका करत मंदिर मस्जिदचा मुद्दा पुढे आणला जात असल्याचे त्यांनी सांगितले माझी प्रकाश आंबेडकर यांना विनंती आहे की त्यांनी मिञ ओळखावे माझी त्यांना खासदार करण्याची इच्छा असल्याचे म्हणाले.

आमचं सरकार आल्यावर मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलकांनावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेवू अशी ग्वाही दिली काॅग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे ताकद उभी करण्याचे आवाहन केले. यावेळी मानवत पाथरी सोनपेठ तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.