सरकारी कर्मचाऱ्यांकडून पुकारण्यात आलेला संप मागे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यात गेल्या  दोन दिवसांपासून  सुरु असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप अखेर आज तिसऱ्या दिवशी मागे  घेण्यात आला आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आली. सरकार सोबत वाटाघाटी झाल्याने हा संप मागे घेण्यात येत आहे. अशी माहिती मिळते आहे. सातवा वेतन आयोग लागू व्हावा तसेच इतर मागण्याकरिता दिनांक ७ ,८,९ रोजी सरकारी कर्मचाऱ्यांकडून बंद पुकारण्यात आला होता . दरम्यान संपाचा आजचा तिसरा दिवस असतानाच हा संप मागे घेण्यात आला आहे. राज्यातील  विविध ठिकाणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी अडीच  दिवस हा संप कडकडीत पाळला.
[amazon_link asins=’B06XFLY878′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6c21baba-9bac-11e8-a096-3357d50d6e8d’]
सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक ७ ऑगस्ट पासून  १७ लाख राज्य सरकारी कर्मचारी तीन दिवसीय संपावर होते  राज्य सरकारी कर्मचारी समन्वय संघटनांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला होता. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून  मंत्रालयाच्या गेटवर निदर्शने देखील करण्यात आली. संपाच्या तिसऱ्या दिवशी सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर ही कोंडी फुटली. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संप मागे घेण्याचं आवाहन सरकारनं केलं होतं. या आवाहनाला कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला.

का केला होता संप

राज्यात होणारी 72 हजार पदांची मेगा भरती मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यात एवढी पदं रिकामी असल्याने कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. तसेच सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता .सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी आता जानेवारीचा मुहूर्त दिला आहे. यापूर्वी दिवाळीचा मुहूर्त दिला होता. अशा प्रकारे सतत सातवा वेतन आयोगा लांबणीवर पडत असल्याने कर्मचारी आक्रमक झाले . शिवाय आता मेगा भरती रद्द केल्याने कर्मचाऱ्यांचा संताप आणखी वाढला आहे. त्यामुअळे सरकारी कर्मचारी तीन दिवसाच्या संपावर होते.

कोण-कोण संपात सहभागी

संपात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी इ.चा समावेश होता.
दरम्यान, राज्य सरकारचे एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी एकदाच संपावर गेल्यास मोठी अडचण निर्माण झाली. महत्त्वाची सरकारी कामंही या अडीच दिवसात ठप्प झाली.