Government Employees | ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांना मिळाली खुशखबर ! DA मध्ये करण्यात आली 9 % वाढ, जाणून घ्या कोणाला होणार ‘फायदा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  केंद्र सरकारने काही सरकारी कर्मचार्‍यांना (Government Employees) छठ पूजानिमित्त (Chhath Pooja) स्पेशल गिफ्ट दिले आहे. सरकारने बीएसएनएल (BSNL) कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता वाढवला (Dearness Allowance Hike) आहे. सोबतच स्पष्ट केले आहे की, वाढलेला महागाई भत्ता (DA) नोव्हेंबर 2021 पासून लागू होईल. (Government Employees)

 

दुसर्‍या शब्दात सांगायचे तर नोव्हेंबर 2021 पासून या सरकारी कर्मचार्‍यांची सॅलरी वाढून (Salary Hike) येईल.
याशिवाय या कर्मचार्‍यांना हाऊस रेंट अलाऊंन्स सुद्धा वाढून (HRA Hike) मिळेल म्हणजे बीएसएनएल कर्मचार्‍यांना डबल फायदा होईल.

 

किती वाढेल महागाई भत्ता

 

सरकारने बीएसएनएल कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याची रक्कम 170 टक्केवरून वाढवून 179.3 टक्के केली आहे.
बीएसएनएलचे बोर्ड स्तरीय आणि बोर्ड स्तराच्या खालील सर्व कर्मचार्‍यांना वाढलेल्या दराने महागाई भत्ता मिळेल.
डीएमधील वाढीचा फायदा 2007 च्या पे-रिव्हीजनच्या आधारावर वेतन घेणार्‍या कर्मचार्‍यांना मिळेल. (Government Employees)

 

78,323 जणांनी घेतला व्हीआरएस

 

बीएसएनएल कर्मचार्‍यांसाठी 1 जुलै 2021 पासून डीए वाढवून 170.5 टक्केवरून 173.8 टक्के करण्यात आला होता.
1 ऑक्टोबर 2021 पासून 179.3 टक्के करण्यात आला.
भारत संचार निगम लिमिटेडमध्ये एकुण 1,49,577 कर्मचार्‍यांपैकी 78,323 जणांनी स्वेच्छा निवृत्ती (VRS) घेतली होती.

 

31 टक्के झाला डीए

 

केंद्र सरकारने डीएसह पेन्शनधारकांच्या महागाई मदत (DR) मध्ये सुद्धा 3 टक्के वाढ केली आहे.
डीए आणि डीआरमध्ये ही वाढ 1 जुलै 2021 पासून लागू मानली जाईल.
आता केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए आणि डीआर 28 टक्केवरून वाढून 31 टक्के झाला आहे.
यामुळे केंद्र सरकारच्या 47.14 लाख कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल.

 

Web Title : Government Employees | dearness allowance increased by 9 percent on chhath puja know who will get benefit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | दुर्दैवी ! बांधकाम अंगावर पडून तरुण कंत्राटदाराचा मृत्यू, दौंडमधील घटना

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,293 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Wankhede family | क्रांती रेडकर आणि यास्मिन वानखेडेंनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट; नवाब मलिकांविरोधात केली तक्रार (व्हिडीओ)