खुशखबर ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार पगार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार देण्याच्या निर्णयावर अखरे शिक्कामोर्तब झाले आहे. दिवाळीपूर्वी पगार देण्याच्या निर्णयावरील स्थगिती उठवण्यात आल्याने येत्या 25 ऑक्टोबरला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी पगार करण्याचा निर्णय 9 ऑक्टोबर रोजी घेण्यात आला होता. मात्र, लेखा कोषागार विभागातील कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने वित्त विभागाला आगावू पगार देणात येणार नसल्याच्या कारणवारून दिवाळीपूर्वी पगार देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होते. यामुळे अनेक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवळी गोड होणार आहे.

दिवाळीपूर्वी पगार करण्याच्या निर्णयामुळे पेन्शनधारकांसह सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार मिळणार आहे. ऐरवी सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 1 तारखेला होत असतो. मात्र, यंदा दिवाळी महिनाअखेरला आल्याने राज्य सकरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वी म्हणजेच 25 ऑक्टोबरला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी