Government Employees Strike | सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Government Employees Strike | जुन्या पेन्शनसाठी (Old Pension Scheme) सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे अनेकांना फटका बसला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधान भवनात एक बैठक बोलावली होती. या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला असून संप (Government Employees Strike) मागे घेण्यात आला आहे.

राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी मागील सात दिवसांपासून जुनी पेन्शन लागू करावी यासाठी संप पुकारला (Government Employees Strike) होता. आता तो मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. संपकऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं संप समन्वय समितीकडून (Coordinating Committee) सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यात अवकाळी पावसामुळे जी कामे प्रलंबीत आहेत ती पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असे समितीने सांगितले आहे.
त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी उद्या (मंगळवार) पासून कामावर हजर रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी सरकारी कर्मचारी गेल्या सात दिवसांपासून संपावर होते.
आता संपकरी आणि सरकारमध्ये यशस्वी तोडगा निघाल्याचे समजतं. संपकऱ्यांच्या या मागणीसाठी राज्य सरकारने
(State Government) एक अभ्यास समिती स्थापन केली असून पुढील तीन दिवसांत त्याचा अहवाल देण्यात येणार आहे.

Web Title : Government Employees Strike | old pension scheme govt employees strike back govt positive to implement old pension scheme with retrospective effect

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

Popatrao Gawade | राष्ट्रवादीचे माजी आमदार, शरद पवारांचे निकटवर्तीय पोपटराव गावडे रूबी हॉलमध्ये दाखल, उपचार सुरू

Pune Crime Suicide News | भाजप नेत्याच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीची पुण्यात आत्महत्या