व्यापार्‍यांना मोठा दिलासा ! सरकारनं आर्थिक वर्ष 2019 साठी GST Annual Return भरण्याची मुदत एक महिन्यानं वाढवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी जीएसटी वार्षिक परतावा आणि ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. सरकारने ही मुदत एक महिन्याने वाढवली आहे. आता ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी जीएसटी वार्षिक परतावा आणि ऑडिट रिपोर्ट दाखल करता येईल. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) ट्विट करून ही माहिती दिली आहे.

सीबीआयसीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘आदर्श आचारसंहिता लक्षात घेता निवडणूक आयोगाकडून योग्य मान्यता मिळाल्यानंतर सरकारने जीएसटीआर-९ आणि जीएसटी ९ सी अंतर्गत वार्षिक रिटर्न भरण्याची तारीख ३० सप्टेंबर २०२० वरून ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढवली आहे.’

महत्वाचे म्हणजे यापूर्वी मे महिन्यात सरकारकडून २०१८-१९ या वर्षासाठी वार्षिक जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख सप्टेंबर २०२० पर्यंत तीन महिन्यांसाठी वाढवली गेली होती.

जीएसटीआर-९ एक वार्षिक रिटर्न आहे, जो करदाते वस्तू व सेवा कर (जीएसटी) राजवटी अंतर्गत भारतात. यामध्ये करदात्याला वर्षाच्या व्यवसायाविषयी पूर्ण माहिती द्यावी लागते. तर जीएसटीआर-९ सी हा एक प्रकारचा ऑडिट फॉर्म असतो, हा जीएसटीआर-९ आणि ऑडिट केलेल्या वार्षिक आर्थिक विवरणामधील सामंजस्याची घोषणा म्हणून मानला जातो.

ईवाय टॅक्स अभिषेक जैन यांच्यानुसार, मुदत पुढे वाढवल्यामुळे त्या व्यापारींना दिलासा मिळाला आहे, जे कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांमुळे जीएसटी वार्षिक परतावा आणि जीएसटी ऑडिट रिपोर्ट पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत होते.