आयकर भरण्याच्या मुदतीत वाढ, ३१ ‘ऑगस्ट’पर्यंत भरा आपला ‘आयकर’ रिटर्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने आयकरधारकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने मंगळवारी आयकर रिटर्न फायलिंगची अंतिम तारीख ३१ जुलैवरुन वाढवून ३१ ऑगस्ट केली आहे. अर्थ मंत्रालयाने एक निर्णय देऊन ही माहिती दिली. पहिल्यांदा आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. यामुळे करदात्यांना आयकर जमा करण्यापासून १ महिन्याचा दिलासा दिला आहे. पण ३१ ऑगस्ट ही अंतिम तारीख असल्याने करदात्यांना या मुदतीत कर भरणे आवश्यक असणार आहे.

त्यामुळे तुम्ही अजून आयटीआर जमा केला नसेल तर तुम्ही तुमची कागदपत्र तयार ठेवा, जर तुमच्याकडे कागद पत्र नसलीत तर तुम्हाला आयकर भरताना समस्या निर्माण होऊ शकते. तुम्हाला यात या कागदपत्राची आवश्यकता असेल. ही कागदपत्र नसतील तर तुमचा खोळंबा होऊ शकतो.

आयटीआर भरण्यासाठी या कागदपत्रांची गरज

१. पॅन कार्ड नंबर

२. आधार कार्ड नंबर

३. घरच्या संपत्ती बाबत कागदपत्र

४. परदेशी संपत्तीशी संबंधित कागदपत्र

५. गुंतवणूकीसंबंधित कागदपत्र

६. घर भाडे भरत असल्यास ती कागदपत्रे

७. टीसीएस क्रेडिटची माहिती देणारा फॉर्म – १६, १६ A आणि १६ B

८. इक्विटी गुतंवणूकमध्ये लॉन्ग एंड शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचा लाभ घेण्यासाठीची कागदपत्र

९. बॅलन्स शीट, नफा तोटा स्टेटमेंट,इतर ऑडिट रिपोर्ट

१०. परदेशात गुंतवणूकीतील उत्पन्नाची कागदपत्रे

११. मागील वर्षाच्या आयकर रिटर्नची झेरॉक्स

१२. टीडीएस सर्टिफिकेट

१३. टीडीएस डिटेल चेक करण्यासाठी फॉर्म २६ एस

१४. वर्षाला मिळालेल्या व्याजाचे माहिती असलेले कागदपत्र

१५. सर्व देशातील आणि विदेशातील बँक खात्यांची माहिती

१६. कर कपातीसाठी गृह कर्ज आणि शैक्षणिक कर्जाचे स्टेटमेंट

१७. म्युचुअल फंड सारख्या गुंतवणूकीची कागदपत्र

१८. जीवन विमा प्रीमियमची जमा केल्याची पावती

१९. मेडीकल इंश्युरन्स प्रीमियम आणि तपासणीची महिती

२०. दान केले असल्यास त्याची पावती

आरोग्यविषयक वृत्त