दिलासादायक ! सरकारने अनेक कामांची कालमर्यादा वाढवली, विलंबाने प्राप्तीकर रिटर्न भरण्याची तारीख सुद्धा बदलली

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशभरात कोरोनाचा प्रकोप सुरू असताना अर्थ मंत्रालयाकडून करदात्यांसाठी दिलासादायक वृत्त समोर आले आहे. अर्थ मंत्रालयाने माहिती दिली की, कोरोना माहामारी दरम्यान करदात्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी टॅक्स जमा करण्यासंबंधी काही कामांची कालमर्यादा वाढवण्यात आली आहे.

कोरोना महामारीमुळे निर्णय
कोरोना महामारीची दुसरी लाट लक्षात घेता अनेक कामांची डेडलाइन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 ची डेडलाइन जी 31 मार्च 2021 ला संपली, ती वाढवून 31 मे 2021 पर्यंत केली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 साठी असेसमेंट वर्ष 2020-21 झाले. यामध्ये लेट फाईनसह 31 मार्च 2021 पर्यंत रिटर्न फाइल करण्याची संधी होती.

बीलेटेड रिटर्न आणि रिवाइज्ड रिटर्नची तारीख वाढवली
फायनान्स मिनिस्ट्रीकडून जारी या आदेशानुसार, असेसमेंट वर्ष 2020-21 साठी इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट 1961 चे सेक्शन 139 चे सब सेक्शन चार आणि पाचच्या अंतर्गत बीलेटेड रिटर्न आणि रिवाईज्ड रिटर्नची तारीख दोन महिन्यांनी वाढवून 31 मे 2021 केली जात आहे. अगोदर ही डेडलाइन 31 मार्च 2021 ला संपली होती.

चॅप्टर एक्सएक्स अंतर्गत अपील टू कमिश्नर प्रकरणात रिटर्न फायलिंगची शेवटची तारीख एक एप्रिल 2021 पर्यंत होती, जी वाढवून 31 मेपर्यंत करण्यात आली आहे. सेक्शन 144 सी च्या अंतर्गत डिस्प्यूट रिजोल्यूशन पॅनलसाठी रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख एक एप्रिलपर्यंत होती, जी वाढवून 31 मे करण्यात आली आहे. सेक्शन 148 च्या अंतर्गत मिळालेल्या नोटीसच्या प्रकरणात रिटर्न फायलिंगची डेडलाइन सुद्धा 31 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.