ड्रायव्हिंग लायसन्स आणि RC सह ‘या’ कागदपत्रांसाठीची मुदत वाढवली, 30 जूनपर्यंत लागणार नाही दंड

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसची वाढती प्रकरणे पहाता सरकारने लोकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने शुक्रवारी मोटर व्हेईकल डॉक्यूमेंट्स जसे की ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी) आणि इतर परमिट्सची व्हॅलिडिटी 30 जून, 2021 पर्यंत वाढवली आहे. जर तुमच्या वाहनाशी संबंधीत आवश्यक कागदपत्रे एक्सपायर होणार असतील किंवा एक्सपायर झाली असतील तर आता ती 30 जूनपर्यंत व्हॅलिड राहतील. वाहनांशी संबंधीत डॉक्यूमेंट्सची व्हॅलिडिटी 31 मार्च, 2021 पर्यंत व्हॅलिड होती.

राज्यांच्या जारी एक अ‍ॅडव्हायजरीत रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने म्हटले की, कोरोना महामारी किंवा लॉकडाऊनमुळे एक्स्टेंशन न होणारे डॉक्यूमेंट्स आणि जे 1 फेब्रुवारी 2020 ला एक्सपायर झाले होते, आता 30 जून 2021 पर्यंत व्हॅलिड मानले जातील. या डॉक्यूमेंट्समध्ये फिटनेस, परमिट, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि इतर डॉक्यूमेंट्सचा समावेश आहे.

यापूर्वी सरकारने 30 मार्च, 2020, 9 जून 2020, 21 ऑगस्ट 2020 आणि 27 डिसेंबर 2020 ला मोटर व्हेईकल्स अ‍ॅक्ट 1988 आणि केंद्रीय मोटर वाहन कायदा 1989 शी संबंधीत डॉक्यूमेंट्सची व्हॅलिडिटी वाढवली होती.

30 जूनपर्यंत व्हॅलिड मानले जातील एक्सपायर्ड डॉक्यूमेंट्स
मंत्रालयाने राज्यांना जारी अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे की, 1 फेब्रुवारीपासून एक्सपायर्ड डॉक्यूमेंट्सची व्हॅलिडिटी 30 जून, 2021 पर्यंत व्हॅलिड मानली जाईल. इन्फोर्समेंट अथॉरिटीजला असे डॉक्यूमेंट्स 30 जून, 2021 पर्यंत व्हॅलिड मानण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे ट्रान्सपोर्ट संबंधीत सेवांना लाभ मिळेल.

मंत्रालयाने म्हटले याच्याशी संबंधीत ही शेवटची अ‍ॅडव्हायजरी आहे आणि राज्य सरकारांनी ही अ‍ॅडव्हायजरी लागू करावी जेणेकरून जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.