महाराष्ट्रात ‘फेल’ झाले भाजपचे ‘चाणाक्य’, ‘एवढ्या’ वेळा झाला ‘पराभव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात रातोरात राजकीय घटनाक्रम पलटल्याच्या चार दिवसानंतर भाजप सरकार कोसळलं. मंगळवारी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या की, भाजपचे चाणाक्य म्हटल्या जाणाऱ्या अमित शहांचा प्लॅन कधी कधी अयशस्वी झाला.
महाराष्ट्र में फेल हुए बीजेपी के 'चाणक्य', ऐसे मौके जब मिली हार
जेव्हा फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले त्या दिवशी सोशल मीडियावर चाणाक्य ट्रेंड करत होतं. परंतु महाराष्ट्रात प्लॅन फेल झाल्याचं दिसून आलं. असे अनेक प्रसंग आले जेव्हा अमित शहांचा प्लॅन फेल झाला आहे.

कर्नाटकात द्यावा लागला राजीनामा
महाराष्ट्र में फेल हुए बीजेपी के 'चाणक्य', ऐसे मौके जब मिली हार
222 जागांच्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला 104 जागा मिळाल्या होत्या. बहुमतासाठी त्यांना 112 चा आकडा गाठायचा होता ज्यासाठी 8 जागांची गरज होती. जेडीएसला 37, काँग्रेसला 78 तर इतरांना 3 जागा मिळाल्या. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगण्यात आलं. परंतु भाजप बहुमत सिद्ध करू शकलं नाही. फ्लोर टेस्टआधीच येडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागला.

2016 साली उत्तराखंडमध्ये डाव उलटला
महाराष्ट्र में फेल हुए बीजेपी के 'चाणक्य', ऐसे मौके जब मिली हार
उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांचे 35 आमदार होते त्यातील 9 आमदारांनी बंडखोरी केली. यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली. काँग्रेसनं त्यांना उच्च न्यायालयात आव्हान दिलं. उच्च न्यायालयाने राष्ट्रपती राजवट बेकायदेशीर असल्याचं सांगितलं. यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टानं क्राँग्रेस सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. हरिश रावत सरकारनं आपलं बहुमत सिद्ध केलं. यानंतर राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली.

अहमद पटेल यांची राज्यसभा निवडणूक
महाराष्ट्र में फेल हुए बीजेपी के 'चाणक्य', ऐसे मौके जब मिली हार
2017 मध्ये राज्यसभा निवडणुकीत गुजरातच्या 3 पैकी दोन जागांवर भाजप अध्यक्ष अमित शहा आणि स्मृती ईरानी यांनी विजय मिळवला. तिसऱ्या जागेवर सस्पेंस यासाठी ठेवण्यात आला कारण भाजपनं काही काँग्रेस आमदार फोडले होते. तिथेही अखेर निवडणूक आयोगाने दोन बंडखोर आमदारांची मते रद्द केली आणि अहमद पटेलांनी भाजपच्या बळवंत राजपूत यांचा पराभव केला.

Visit : Policenama.com