खुशखबर ! ‘फ्री’ मध्ये घ्या खास ‘ट्रेनिंग’, नोकरी सोबतच चालु करा व्यवसाय अन् कमवा हजारो रूपये दरमहा, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – मागील वर्षी दिल्ली सरकारने वीजेची कमी पूर्ण करण्यासाठी सोलर पॅनल लावण्यास मंजूरी दिली होती. दिल्ली सरकारने हा निर्णय सोलर एनर्जीला प्रोस्ताहन देण्यासाठी घेतला. याशिवाय सरकारने हे सांगितले की उपभोक्त्यांना सोलर पॅनल लावण्यासाठी कोणताही खर्च येणार नाही. हा खर्च सोलर लावणारी कंपनी उचलेल. यातूनच तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करु शकतात.

 

सरकारने 50 तरुणांना फ्री मध्ये प्रशिक्षण देणार असल्याचे सांगून त्यांना सूर्य मित्र बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यात 18 हजार तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे ते आता सूर्य मित्र म्हणून काम करत आहेत. मिनिस्ट्री ऑफ न्यू अ‍ॅण्ड रिन्युएबल एनर्जीने त्यांना प्रशिक्षण दिले आहे. तुम्ही नोकरी सह या व्यवसायात सहभागी होऊ शकतात.



काय आहे सूर्य मित्र कार्यक्रम –

मिनिस्ट्री ऑफ न्यू अ‍ॅण्ड रिन्युएबल एनर्जीच्या स्पॉसरशिप अंतर्गत सूर्य मित्र कौशल्य विकास कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ सोलर एनर्जीने हा कार्यक्रम सुरु केला आहे. याअंतर्गत संपूर्ण देशात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यानंतर अर्जदारांना स्किल डेवलपमेंट सेंटरवर अर्ज करु शकतात.

सूर्य मित्र बनण्यासाठी योग्यता –
जर तुम्ही 10 वी पास असाल आणि इलेक्ट्रिशन, वायरमॅन, इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, फिटर, शीट मॅटलमध्ये आयटीआय केले असेल तर तुम्ही पात्र आहेत. तुमचे वय 18 पेक्षा अधिक असेल तर तुम्ही एनआयएसई द्वारे अधिकृत सेंटरमध्ये अर्ज करु शकतात. ट्रेनीच्या निवडीवेळी त्या तरुणांना प्रमुखता देण्यात येईल, जे ग्रामीण भागातून आले आहेत किंवा महिला तसेच एससी एसटी संबंधित असतील. या प्रोग्रामची विशेषता ही आहे की उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांना अयोग्य मानून प्रवेश देण्यात येणार नाही.

600 तास देण्यात येणार प्रशिक्षण –
हा पूर्णता मोफत कार्यक्रम असणार आहे. जेथे राहणे आणि खाणे देखील मोफत असेल. हा कार्यक्रम 600 तासांचा असेल. प्रशिक्षणानंतर अर्जाचे मुल्यांकन करण्यात येईल. त्यांनंतर एनआयएसईकडून प्रमाणपत्र देण्यात येईल.

नोकरीपासून व्यवसायापर्यंतची संधी –
प्रशिक्षण घेतल्यानंतर तरुणांना स्वत:चा सोलर व्यवसाय सुरु करता येईल. तरुणांनी सोलर सिस्टिमचा मेंटेनन्स, ऑपरेशन आणि इंस्टॉलेशन याचे प्रशिक्षण देण्यात येईल. यामुळे प्रशिक्षित तरुणांना परदेशी सोलर कंपन्यांमध्ये नोकरी देखील मिळेल.

 

Visit : policenama.com