सरकारनं वाढवली GST रिटर्न फाईल करण्याची तारीख, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने वस्तू आणि सेवा करासंबंधित (जीएसटी) वर्ष 2017 – 18 आणि वर्ष 2018 – 19 ची वार्षिक रिटर्न भरण्याची अंंतिम तारीख वाढवली आहे आणि यासह जीएसटीआर 9 तसेच जीएसटीआर 9 सी फॉर्मला सरळ सोपे बनवण्यात येत आहे.

31 डिसेंबरपर्यंत वाढण्यात आली तारीख
केंद्रीय अप्रत्यक्ष आणि सीमा शुल्क बोर्डाने गुरुवारी माहिती दिली की 2017 – 18 साठी जीएसटीआर 9 आणि जीएसटीआर 9 सी भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2019 होती जी वाढवून 31 डिसेंबर 2019 करण्यात आली आहे. या प्रकारे 2018 – 19 दरम्यान हे दोन्ही फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2019 वरुन वाढून 31 मार्च 2020 करण्यात आली आहे.

सोपे झाले 2 फॉर्म
सीबीआयसीने माहिती देताना सांगितले की सरकारने हे दोन्ही फॉर्म सरळ सोपे करण्याचा निर्णय घेतला आहे. आता दोन्ही फॉर्मवर विविध क्षेत्राचे पर्याय असतील. ते म्हणाले की जीएसटीआर 9 आणि जीएसटीआर 9 सी भरण्यास येणाऱ्या अडचणी पाहता ते भरण्यासाठीची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. सीबीआयसीने सांगितले की अंतिम तारीखेत वाढ करण्यात आल्यानंतर दोन्ही फॉर्म सरळ सोपे करण्यात आले आहेत. ज्यामुळे वार्षिक रिटर्न भरणे सोपे होईल. रिटर्न भरण्याच्या तारखेत वाढ करण्यासंबंधित अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

 

Loading...
You might also like