जालना : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळी परिस्तिथी : धनंजय मुंढे

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – अंबड तालुक्यातील सुखापुरी तसेच बेलगांव येथे आज ४.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांनी सुखापुरी महसूल मंडळात पडलेल्या भीषण दुष्काळाची पहाणी करून शेतकऱ्यांशी हितगुज साधला, शेतकऱ्यांच्या दुष्काळी समस्या जाणून घेतल्या. मुंढे यांनी येत्या दोन दिवसात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी राजाला जास्तीत जास्त म्हणजेच सर्व बागायतदार शेतकऱ्यास हेक्टरी १ लाखाची मदत तसेच जिरायत शेतकऱ्यास हेक्टरी ५० हजाराची मदत मिळवून देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात अतोनात प्रयत्न करणार.

सरकार दुष्काळ जाहीर करत आहे पण मदत मात्र जाहीर करत नाही हा आत्ताचा दुष्काळ १९७२ पेक्षाही मोठा भीषण दुष्काळ आहे.सरकारने कसलाही विचार न करता शेतकऱ्यांना भरघोस मदत जाहीर करावी.मुख्यमंत्री केवळ बैठका घेत आहेत.प्रशासन तसेच सरकार केवळ शेतकऱ्यांची फसवणूक करतांना दिसून येत आहे.बैठका घेऊनच भागत नाही तर दुष्काळ जाहीर करुन ताबडतोब आर्थिक मदत द्यावी.दुष्काळ जाहीर करून २५ दिवस झाले आहेत.अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळणार किती हे माहीत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

तसेच शेतकऱ्यांचे चालू वर्षभराचे कृषी विजबिल माफ करावे व शेतकऱ्यांच्या मुलांची सर्व प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक फी शासनाने बिनशर्त भरावी.कारण शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत तर भरणार कोठून?

२० ते २५ वर्ष फळबागांची शेतकरी जपवणूक करतो मात्र अशा भीषण दुष्काळात जेव्हा हे सर्वच फळबाग नष्ट होतात त्यावेळी शेतकऱ्यांच्या येणाऱ्या दोन पिढ्या पूर्णपणे उध्वस्त होतात अशा वेळी खरी गरज असते ती शेतकऱ्यास आर्थिक मदतीची,म्हणूनच सरकारने दुष्काळ जाहीर करून होतं काय त्यांना ताबडतोब भरघोस आर्थिक मदत जाहीर करायलाच पाहिजे.

यावेळी आ.राजेश टोपे,रा.काँ.जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख,जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश टोपे,सतीश होंडे,रईस बागवान,डॉ.पवार,राजन उढाण,बाबासाहेब बोंबले,परमेश्वर काळबंडे,जिजा मोताळे अशोक गोरे उपस्थित होते