डिस्प्लेच्या आयातीवर 10 % लागणार चार्ज, महाग होऊ शकतात मोबाइल फोन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी काळात मोबाइल फोन महाग होऊ शकतात. कारण, केंद्र सरकारने डिस्प्लेच्या आयातीवर 10 टक्के शुल्क लागू केले आहे. इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (आयसीईए) ने ही माहिती दिली आहे. आयसीईएने सांगितले की, सरकारच्या या निर्णयाने मोबाइल फोनचे दर 3 टक्केपर्यंत वाढू शकतात.

आयसीईएचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज महेंद्रू यांनी वक्तव्यात म्हटले, यामुळे मोबाइल फोनच्या किमतीत दिड ते तीन टक्क्यांची वाढ होईल.

महेंद्रू म्हणाले, कोविड-19 महामारी आणि राष्ट्रीय हरित प्राधिकारणाच्या (एनजीटी) प्रतिबंधामुळे डिस्प्ले असेंब्लीचे उत्पादन योग्य प्रमाणात वाढू शकले नाही. यामध्ये उद्योग अपेक्षेनुसार पुढे वाटचाल करू शकले नाहीत. आम्ही स्पेअरपार्टच्या स्थानिक निमिर्तीसाठी प्रतिबद्ध आहोत. मात्र, आता आमचे लक्ष जागतिक बजारात मोठा भाग मिळवण्यावर आहे, केवळ आयातीची भरपाई करण्यावर नाही.

डिस्प्ले असेंब्ली आणि टच पॅनलवर हे शुल्क एक ऑक्टोबरपसून लागू करण्याचा प्रस्ताव होता. आयसीईएच्या सदस्यांमध्ये अ‍ॅप्पल, हुवावेई, शाओमी, वीवो आणि विंस्ट्रॉन सारख्या कंपन्यांचा सहभाग आहे.

2016 मध्ये होता प्रस्ताव
2016 मध्ये घोषित क्रमबद्ध निर्मिती कार्यक्रम (पीएमपी) च्या अंतर्गत उद्योगासह सहमतीमध्ये तो लावण्याचा प्रस्ताव होता. पीएमपीचा उद्देश्य सुट्या भागांच्या स्थानिक निर्मितीला प्रोत्साहन देणे आणि त्यांनतर त्यांची आयात कमी करणे आहे.

2016 मध्ये पहिला प्लँट
वेदांता समूहाचे चेअरमन अनिल अग्रवाल प्रवर्तित वोल्कॉन इन्व्हेस्टमेंट्सने ट्विनस्टार डिस्प्ले टेक्नोलॉजीजच्या नावाने 2016 मध्ये देशातील पहिल्या एलसीडी निर्मिती कारखान्याची स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यावर 68,000 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार होती. मात्र, या प्रस्तावास सरकारची मंजूरी मिळाली नाही आणि ही योजना पुढे जाऊ शकली नाही.