खुशखबर ! ‘बँकिंग’सह इतर ‘स्पर्धा परिक्षा’ आता होणार स्थानिक भाषांमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत महत्वाची माहिती दिली. बँक भरती परिक्षा आणि इतर परिक्षा स्थानिक भाषेत घेण्यावर सरकार विचार करत आहे. कर्नाटक आणि दक्षिण भारतातील खासदाराच्या या मागणीवर सरकार विचार करत आहे. काँग्रेसचे खासदार जी सी चंद्रशेखर यांनी राज्यसभेत या संबंधित प्रश्न विचारला होता.

चंद्रशेखर यांनी सांगितले की, जर कोणी सदस्य आपल्या स्थानिक भाषेत किंवा मान्यता प्राप्त २२ भाषांमध्ये संसदेत आपले मत मांडू इच्छितात. तर त्यांना त्याबाबतची सूचना द्यावी लागते. जेणे करुन भाषांतर करण्याची व्यवस्था करण्यात येईल.

ते पुढे असे ही म्हणाले की, भारतीय बँकिंग सेवा परिक्षा आणि इतर भरती परिक्षेत इंग्रजी आणि हिंदीत घेतल्या पाहिजेत. तसेच स्थानिक परिक्षार्थींची सुविधेचा विचार केला तर या परिक्षांचे आयोजन कन्नड भाषेत करण्यात यावे.

यावर संसदेत उपस्थित अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, लोकसभेतील काही खासदार या मुद्दा घेऊन मला भेटले. हा मुद्दा त्या सर्व राज्यांशी संबंधित आहे. ज्या राज्यांची आपली वेगळी भाषा आहे. सीतारामन म्हणाल्या की हा गंभीर चिंतेचा विषय आहे. मी याकडे पाहत आहे आणि यावर विचार केल्यानंतर मी हा मुद्दा संसदेत मांडेल.

आरोग्यविषयक वृत्त – 

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश 

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन