देशात मंदिर-मस्जिदचा प्रश्न पुढे करून जातीयतेढ निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न : खा. अशोक चव्हाण

मुखेड : माधव मेकेवाड – मुखेड येथे दि. २५ रोजी सदर संघर्ष यात्रेचे भव्य जाहिर सभेद्वारे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी टिकास्त्र सोडले आहे. यावेळी जांब बु.-मुखेड-एकलारा सुमारे तिन हजार दुचाकी रॅली काढण्यात आली हे लक्षणीय ठरले. या संघर्ष यात्रेची रॅली जाहीर सभेत रूपांतरित झाली. यावेळी मंचावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, नसीम खान, बस्वराज पाटील, काँग्रेस प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे, आ. वसंतराव चव्हाण, माजी आ. रोहिदास चव्हाण, श्याम तेलंग, युवक जिल्हाध्यक्ष पप्पु पा.कोंडेकर, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, नसीम खान, बस्वराज पाटील, माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी आपल्या मनोगतातुन राज्य व केंद्र सरकारच्या धोरणावर चौफेर टिका केली.

पुढे बोलताना खा.चव्हाण म्हणाले की, देशात निवडणूकीच्या अगोदर मंदिर-मस्जिदीचा प्रश्न पुढे करून जातीयतेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यासाठी आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेवून भाजप-सेनेला सत्तेपासुन दुर ठेवणार असल्याचा निर्धार केला. महाराष्ट्राच्या अस्मीतेचा विषय असलेला शिवस्मारक, इंदूमिल प्रकरण प्रलंबित ठेवून अनेकांच्या आरक्षणाचा गुंता वाढविण्याचे पाप हे सरकार करीत आहे. सद्या भाजपापासून बेटी वाचविण्याची वेळ जनतेवर आली आहे. इंधन दरवाढीबद्दल ही त्यांनी सरकारला धारेवर धरले. याप्रसंगी अनेक इतर पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते शेषेराव चव्हाण, व्यंकटराव पा.दापकेकर, माजी जि. प.अध्यक्षा सौ.वैशालीताई चव्हाण, जि.प.सदस्या सुशिलाबाई बेटमोगरेकर, मंगाराणी अंबुलगेकर, शौकत खान पठाण, संतोष बोनलेवाड, श्रावण रॅपनवाड, सदाशिवराव पाटील, भाऊसाहेब मंडलापुरकर, नंदकुमार मडगुलवार, राजन देशपांडे, सुरेश पाटील बेळीकर, डाॅ.रणजीत काळे, महिला कमेटी ता.अध्यक्षा अनिताताई राजुरकर, शहराध्यक्षा शारदा पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.