मोदी सरकारच्या ‘या’ योजनेमुळं महिलांना मिळणार पैसे कमवण्याची ‘सुवर्णसंधी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीत काय बदल होणार, कोणते नवीन निर्णय सरकार घेणार, कोणत्या योजना यावर्षात आखल्या जाणार याची नागरिकांना प्रतीक्षा असतानाच मोदी सरकार कडून गृहिणी महिलांच्या रोजगारासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. गृहिणींना रोजगारासोबत कसे जोडावे याबद्दल काम केले जात आहे, यासाठी लोकांच्या कल्पना देखील मागविल्या आहेत. सरकारने पॉलिसी कमिशनला सर्व पर्यायांची यादी प्रदान करण्यास सांगितले आहे. ज्या अंतर्गत गृहिणींना थेट रोजगार आणि कमाईशी जोडले जाऊ शकते.

शासनाकडे आतापर्यंत १ हजाराहून जास्त कल्पना आल्या आहेत. यातील १०० हून अधिक कल्पनांची निवड करण्यात आली आहे. अजून चांगल्या कल्पनांची गरज आहे तर आजच्या शेवटच्या दिवशी जास्त प्रमाणात कल्पना येण्याची शक्यता आहे. पॉलिसी कमिशन आणि पीएमओचे अधिकारी यावर आधी पासूनच स्वतंत्रपणे काम करत आहे.

मुख्यत: शहरी भागातील १०० जिल्ह्यांमध्ये ही योजना पहिल्यांदा राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत गृहिणी महिलांना घरी बसून रोजगार कसा मिळवता येऊ शकतो याचे प्रशिक्षण ही दिले जाणार आहे. याअंतर्गत पॉलिसी कमिशनला आवश्यक प्रशिक्षण प्रणाली विकसित करण्यास सांगितले आहे. महिलांसाठी ही सगळ्यात मोठी योजना ठरू शकते अशी जनतेची आशा आहे.

वंचितला भाजपची ‘बी’ टीम म्हणणाऱे अशोक चव्हाण नरमले, ती टीका ‘राजकिय’

तब्बल १८ महिन्यापासून पगाराविना,अण्णाभाऊ साठे स्मारक समिती कर्मचाऱ्यांची हेळसांड

जाती-धर्मामुळे मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली दिली जातेय – डॉ. गणेश देवी

पारधी समाजाच्या महिलेचा विनयभंग करून मिरच्या चोरीच्या आरोपावरून मारहाण

सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ?

‘मेंदू’ आणखी तल्लख करण्यासाठी ‘हे’ उपाय आहेत फायदेशिर

‘केस गळणे’ हा असू शकतो आजारपणाचा संकेत

आश्चर्यच ! आता पोटातील गॅस बाहेर पडताच दुर्गंधी ऐवजी दरवळेल सुगंध

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like