CCL Recruitment 2021 : मोठी भरती ! सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये 482 पदे भरणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  ‘सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड’ने (CCL) 482 पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट centralcoalfields.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतात. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी, 2021 निश्चित करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेबाबत माहिती…

पदांची संख्या –

सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये या भरती प्रकियेंतर्गत ऍप्रेंटिसच्या 482 पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

‘सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड’मध्ये या भरती प्रकियेंतर्गत ऍप्रेंटिसच्या या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी-12 वी उत्तीर्ण असणे बंधनकारक असेल.

वयोमर्यादा –

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे असावे तर कमाल मर्यादा 21 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

अर्ज शुल्क 

या पदासाठी अर्ज करताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज पूर्णपणे नि:शुल्क अर्ज असणार आहे.

निवड प्रक्रिया 

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी – 12 वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच मेरिट लिस्टच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

असा करा अर्ज –

इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट centralcoalfields.in च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी, 2021 असणार आहे.