Sarkari Naukri 2020 : रेल्वेसह ‘या’ विभागांमध्ये मेगा भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –
१०वी पास विद्यार्थ्यांना रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी 

Eastern Railway Recruitment 2020 :
रेल्वे भरती बोर्डा (RRB) ने अनेक पदांवर अर्ज मागविले आहेत. पूर्व रेल्वे विभाग कोलकातामध्ये ट्रेड अप्रेंटिस अंतर्गत २,७९२ पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. रेल्वे भरती मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवार १३ मार्च २०२० पर्यंत अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १५ वर्षे व जास्तीत जास्त वय २४ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या पदासाठी उमेदवार ५० टक्के गुणांसह १०वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. पूर्व रेल्वे विभाग कोलकाता येथे प्रशिक्षकांच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना १०० रुपये फी भरावी लागेल, तर महिला व अनुसूचित जाती / जमातीच्या उमेदवारांना फी भरावी लागणार नाही.

DRDO मध्ये या पदांची भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

DRDO Recruitment 2020 :
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली बातमी आहे. डीआरडीओने ट्रेड अ‍ॅप्रेंटीस अंतर्गत फिटर, टर्नर, टूल अँड डाय मेकर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन यांच्यासह विविध पदांवर अर्ज मागविले आहेत. या सर्व पदांवर शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ०६ मार्च २०२० आहे.

ISRO मध्ये १८२ पदांची भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

ISRO Recruitment 2020 :
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांनी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, टेक्निशियन बी, कुक, अवजड वाहन चालक ए आणि हलके वाहन चालक ए च्या रिक्त पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षापर्यंत असणार आहे. या पदांसाठी आवेदन शुल्क सर्वसाधारण, ओबीसी उमेदवारांना ३०० रुपये असणार आहे तर महिला व अनुसूचित जाती / जमाती व अपंग उमेदवारांना फीमध्ये सवलत देण्यात आली आहे.

BSF मध्ये ३१७ पदांची भरती, असा करा अर्ज

BSF Recruitment 2020 :
डायरेक्टरेट जनरल बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (BSF) ने एसआय (मास्टर), एसआय (इंजिन ड्रायव्हर), एसआय (वर्कशॉप), एचसी (मास्टर), एचसी (इंजिन ड्रायव्हर) सह BSF मध्ये ३१७ पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय २० वर्षे आणि जास्तीत जास्त वय २८ वर्षे असणे बंधनकारक आहे. एसआय (मास्टर), एसआय (इंजिन ड्रायव्हर), एसआय (वर्कशॉप) पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना ३५,४०० ते १,१२,४०० रुपये पगार देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च आहे.

RSMSSB Recruitment 2020 :
राजस्थान सबऑर्डिनेट अँड मिनिस्टीरियल सर्विस सिलेक्शन बोर्डा (RSMSSB) ने ४,४०० पेक्षा जास्त पटवारी पदांसाठी अर्ज मागविले आहेत. एकूण ४,४२१ पदांमधून ३,८१५ पदे ही गैर आदिवासी उपयोजनेसाठी तर ६०६ पदे आदिवासी उपयोजनेसाठी आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत १९ फेब्रुवारी २०२० पर्यंत आहे. जर आपल्याला या पदांसाठी अर्ज करावयाचा असेल तर आपल्याला अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लिंकवर नोंदणी करावी लागेल.