सरकारी नोकरीची ‘सुवर्णसंधी’ ! ‘फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’मध्ये १.५० लाख पगाराची नोकरी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी फूड काॅर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी आहे. जनरल मॅनेजर या पदासाठी कंपनीने अर्ज मागवले असून तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि १९ ऑगस्ट आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि गुवाहाटी या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध असून फक्त इंजिनियर्स असलेल्या व्यक्तींनाच या ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे.

पद आणि माहिती

१)ट्रान्सफर डेप्युटेशन- १ पद
२)पर्मनंट अ‍ॅब्जाॅर्प्शन- १पद

या ठिकाणी करावे लागेल काम

या कामासाठी तुमची निवड झाल्यास तुम्हाला मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि गुवाहाटी या ठिकाणी काम करावे लागेल.

शैक्षणिक पात्रता
जनरल मॅनेजर- या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री त्याचबरोबर सिव्हिल, इलेक्ट्रिक किंवा मेकॅनिकल इंजिनीयरची डिग्री ,१० वर्षांचा कामाचा अनुभव

इतका मिळेल पगार
या पदासाठी निवड झालेल्या व्यक्तींना वार्षिक १० लाख ते २६ लाख रुपयांपर्यंत पगार मिळेल.

निवड प्रक्रिया
प्रत्येक उमेदवाराची निवड वैयक्तिक मुलाखतीद्वारे होईल.

या ठिकाणी करा अर्ज
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी fci.gov.in या वेबसाईटवर जाऊन ‘Appointment to the Post of General Manager(Engineering) on Transfer Deputation/Permanent Absorption Basis in the Food Corporation of India’ या लिंकवर क्लिक करून अर्ज करावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता
द एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, फूड कॉरपोरेशन ऑफ इंडिया, हेडक्वाटर्स, १६-२०, बाराखंभा गल्ली , नवी दिल्ली, ११०००१

आरोग्यविषयक वृत्त –