Government Job | पदवीधर आणि 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, थेट मुलाखत; जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधर आणि 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी (Government Job) करण्याची सुवर्णसंधी आहे. सरकरी संस्थेत काही पदं भरतीसाठी (Government Job) खुली झाली आहेत. नवी दिल्लीतील राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्थेमध्ये (National Malaria Research Institute) विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली आहे.

कसा करायचा अर्ज

इच्छूक उमेदवारांनी राष्ट्रीय मलेरिया संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरुन अर्ज करायचा आहे. जाहीर झालेल्या अधिसूचनेनुसार या सरकारी संस्थेत सहा रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.

पदाचे नाव आणि रिक्त जागा

संशोधन सहाय्यक (Research Associate) – 2 जागा
कीट कलेक्टर (Kit Collector) – 2 जागा
मल्टीटास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) – 2 जागा

शैक्षणिक पात्रता

संशोधन सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc. पदवी असणे गरजेचे आहे. तर कीट कलेक्टर आणि मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

थेट मुलाखतीद्वारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहीर करण्यात आलेली अधिकृत अधिसूचना पहावी.

महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना जारी झाल्याची तारीख – 19 जुलै 2021
मुलाखतीची तारीख – 5 ऑगस्ट 2021
अधिकृत वेबसाईट – nimr.org.in

हे देखील वाचा

Ratnagiri Flood | दुर्देवी ! चिपळूणच्या कोविड रुग्णालयात 8 रुग्णांचा मृत्यू;

Koregaon Bhima Case | कोरेगाव भीमा चौकशी आयोगास पुन्हा मुदतवाढ; 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली मुदत

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Government Job | jobs alert sarkari naukari for class 10th pass graduates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update