खुशखबर ! भारतीय क्रीडा प्राधिकरणात (SAI) नोकरीची संधी; प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक पदासाठी 320 जागावर भरती, जाणून घ्या

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – क्रीडा क्षेत्रात सरकारी नोकरी करू इच्छीणा-या तरुणांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये प्रशिक्षक आणि सहायक प्रशिक्षक पदासाठी तब्बल 320 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आजपासून (दि. 20 एप्रिल) 20 मेपर्यंत sportsauthorityofindia.nic.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज सादर करता येईल. ही पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पात्रता : प्रशिक्षक आणि सहायक प्रशिक्षक या दोन्ही पदांसाठी साई (SAI) किंवा NS NIS किंवा अन्य देशी किंवा विदेशी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोचिंगमध्ये डिप्लोमा आणि 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. किंवा ऑलिम्पिक्स/वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत पदकविजेता/विजेती किंवा दोन वेळा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार विजेता/विजेती असणे आवश्यक आहे.

वेतनः कोचसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 1,05,000 रुपयांपासून 1,50,000 रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल. तर असिस्टंट कोचसाठी 41,420 रुपयांपासून 1,12,400 रुपयांपर्यंत वेतन मिळेल.

वयोमर्यादाः प्रशिक्षक पदासाठी जास्तीत जास्त 45 वर्षांपर्यंतच्या व्यक्ती अर्ज करू शकतात. सहायक प्रशिक्षक पदासाठी जास्तीत जास्त 40 वर्षांपर्यंतच्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2021

भरण्यात येणारी रिक्तपदे खालीलप्रमाणेः
1) प्रशिक्षक :100
तिरंदाजी- 07, अ‍ॅथलेटिक्स -10, बॉक्सिंग -07, हॉकी -07, शूटिंग -07, वेटलिफ्टिंग -07, रेसलिंग (कुस्ती) -07, सायकलिंग -07, तलवारबाजी -07, ज्युडो -07, रोविंग -07, स्विमिंग -02, टेबल टेनिस -02, बास्केटबॉल -02, फुटबॉल -02, जिम्नॅस्टिक -02, कबड्‌डी आणि खो-खो -02, कयाकिंग -02, तायक्वांदो -02, व्हॉलीबॉल -02, वुशु –02.

2) सहायक प्रशिक्षक : एकूण 220
तिरंदाजी- 13, अ‍ॅथलेटिक्स -20, बॉक्सिंग -13, हॉकी -13, शूटिंग -03, वेटलिफ्टिंग -13,रेसलिंग (कुस्ती) -13, सायकलिंग -13, तलवारबाजी -13,ज्युडो -13, रोविंग -13, स्विमिंग -07, टेबल टेनिस -07, बास्केटबॉल -06, फुटबॉल -10, जिम्नॅस्टिक -06, कबड्‌डी आणि खो-खो -07, कयाकिंग -06, तायक्वांदो -06, व्हॉलीबॉल -06 ,वुशु -06, हँडबॉल -03,कराटे -04.