Government Job Recruitment | पशुसंवर्धन विभागातील २०१७ आणि २०१९ ची भरती प्रक्रिया रद्द; लवकरच राबविणार नवीन भरती प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Government Job Recruitment | राज्य सरकारकडून पशुसंवर्धन विभागातील (Animal Husbandry Recruitment) २०१७ आणि २०१९ साली काढण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. जीआर काढत याबाबत राज्य शासनाने माहिती दिली. २०१७ साली १३८ तर २०१९ साली ७२९ पदांसाठीची जाहिरात पशुसंवर्धन विभागाकडून प्रसिध्द करण्यात आली होती. २०१९ सालच्या भरती प्रक्रियेसाठी एकूण ३ लाख २९ हजार ६८९ परिक्षार्थिंनी अर्ज सादर केले होते. मात्र, आता ही भरती प्रक्रिया रद्द करण्याबाबतचा जीआर राज्य शासनाने काढला आहे. तसेच आधी राज्यशासनाकडून आरोग्य भरती रद्द करण्यात आली होती. आणि आता पशुसंवर्धन विभागातील भरती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे. एकीकडे ७५००० शासकीय नोकरदार भरतीची (Government Job Recruitment) घोषणा करायची आणि दुसरीकडे विविध विभागांमधील जुन्या जाहिराती जीआर काढत रद्द करायच्या. अशी चर्चा विद्यार्थ्यांमध्ये सुरू आहे.

दरम्यान, पशुसंवर्धन विभागातील भरती प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार असल्याचेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पशुसंवर्धन आयुक्तालयांतर्गत सरळसेवा कोट्यातील गट क आणि ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत आधी २०१७ आणि नंतर २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पशुवसंर्धन विभागातील ७२३ पदांसाठी ही जाहिरात काढण्यात आली होती. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. पैसे भरुन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जही भरले होते. मात्र आजपर्यंत परीक्षा झाली नाही. त्यातच आता ही भरती रद्द करण्यात आल्यासंबंधीचा जीआर राज्य शासनाकडून काढण्यात आला आहे.

खरंतर ही प्रक्रिया रद्द केली नसून फक्त नव्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राजपत्रित
पशुवैद्यक संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामदास गाडे यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांनी या परिक्षेसाठी परिक्षा शुल्क भरले होते त्यांचे परिक्षा शुल्क देखील परत देण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना डॉ. रामदास गाडे म्हणाले. जुन्या भरती प्रक्रियेमध्ये काही त्रुटी होत्या त्यामुळे त्या दूर करून आता नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच नवीन भरती प्रक्रियेमुळे रखडलेले प्रश्न दूर होतील. असा विश्वास देखील यावेळी बोलताना डॉ. रामदास गाडे यांनी व्यक्त केला. (Government Job Recruitment)

दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून पशुसंवर्धन विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही.
त्यामुळे सरळसेवेमध्ये भरण्यात येणाऱ्या रिक्त जागांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
त्यामुळे ही भरती प्रक्रिया जरी पुढे गेली असली तरी यात जागा वाढतील. तसेच ज्यांची वयोमर्यादा संपली आहे.
त्यांच्याबाबत देखील शासन विचार करेल. अशी माहिती पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिली.

पशुसंवर्धन विभागात भरती प्रक्रिया राबवत असताना काही ठिकाणी फसवणूकीच्या घटना घडल्या होत्या.
त्यामुळे भरती प्रक्रिया आता नव्याने राबविली जाणार आहे.
तसेच यावेळी भरती प्रक्रियेमध्ये २० ते ३० टक्क्यांपर्यंत जागा वाढण्याची शक्यता आहे.

Web Title :- Government Job Recruitment | state govt cancel the recruitment in animal husbandry department

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Davos World Economic Forum 2023 | दावोस जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार; एक लाखांहून अधिक रोजगार निर्मिती

Pune District Planning Committee | पुणे जिल्हा नियोजन समितीवर सदस्य नियुक्त; 20 जणांचा समावेश

Sanjay Raut | ‘फडणवीस बदला घेतात की नाही, हे मी सांगू शकत नाही,’ संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सूचक विधान

Nashik Crime | नाशिक पुन्हा हादरलं! जुन्या भांडणातून तरुणाचा निर्घृण खून, 24 तासात दोन घटना