मंत्रालयात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी चालून आली आहे. भारत सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत, अनेक रिक्त जागांसाठी भरती सुरू करण्यात आली (ministry-of-indian-government-on-various-posts-pa-in-different-laguages) आहे. मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन यासाठी अर्ज करू शकता. या भरतीसाठी 44, 900 ते 1,42,400 पर्यंत वेतन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे 12 उत्तीर्ण उमेदवारांना देखील यासाठी अर्ज करता येणार आहे.

या पदांसाठी भरती
कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या विभागात उर्दू, कोकणी, नेपाळी, संथाली आणि तमिळ भाषांसाठी वैयक्तिक सहाय्यक (प्रादेशिक भाषा) अशा पाच पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी उमेदवारांना 12 वी पास असणे गरजेचे आहे. त्याशिवाय संबंधित भाषांव्यतिरिक्त कम्प्यूटरमध्ये निपुण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचं वय 30 वर्षांपेक्षा अधिक नसावे. उमेदवार http://leligslative.gov.in/documents/recruitment या लिंकवर जाऊन या पदांसाठी संबंधित पात्रता, पदांसाठीचे निकष आणि इतर तपशील मिळवू शकतात.

येथे अर्ज जमा करा
उमेदवार या पदांसाठीची जाहिरात जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत वेबसाईटवर उपलब्ध नमुन्यानुसार, अर्ज भरू शकतात. आरके शर्मा, अवर सचिव, भारत सरकार कायदा आणि न्याय मंत्रालय विधान विभाग, रूम नंबर 412 बी, ए विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली येथे अर्ज जमा करावा लागेल.