‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’मध्ये 300 जागांसाठी भरती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती निघाली असून 380 जणांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली असून 30 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला https://plis.indianoilpipelines.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

निवड प्रक्रिया –
या पदांसाठी उमेदवारांची निवड हि 100 गुणांच्या लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार असून कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.

परीक्षेची तारीख –
या पदांसाठी 8 डिसेंबर रोजी परीक्षा होणार असून अधिक माहितीसाठी आणि वेबसाईटला सतत भेट देत रहा.

असा करा अर्ज –

1) या पदांसाठी अर्ज करण्यासाठी plis.indianoilpipelines.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
2) तेथील होमपेजवरवरील अप्रेंटिसशिप यावर लिंक करा.
3) त्यानंतर ‘I have understood button’ या लिंकवर क्लिक करा.
4) विचारण्यात आलेली सर्व माहिती भरल्यानंतर लॉगइन करा.
5) त्यानंतर पूर्ण माहिती भरल्यानंतर फोटो अपलोड करा.
6) यानंतर तुमचा फॉर्म भरला जाईल आणि तो सबमिट करावा.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like