सरकारी नोकरीची ‘सुवर्ण’संधी ! 10 वी पास उमेदवारांसाठी ‘इथं’ मेगा’भरती’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेने पुन्हा एकदा मोठी भरती प्रक्रिया राबवली आहे. या अंतर्गत मध्य रेल्वेत तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. मध्य रेल्वेने फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, टेलर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, मॅकेनिकसह अन्य पदांवर भरती केली जाणार आहे. मध्य रेल्वेकडून एकूण 2,562 पदावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

असा करा अर्ज –
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला म्हणजेच https://www.rrccr.com/ ला भेट द्यावी लागेल. त्यावरुन उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज प्रक्रियाचे अंतिम तारीख 22 जानेवारी आहे.

शैक्षणिक पात्रता –
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारींनी मान्यता प्राप्त संस्थेतून 10 वी पास असणे आवश्यक आहे. याबरोबरच संबंधित ट्रेडचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –
उमेदवाराचे किमान वय 15 वर्ष आणि कमाल 24 वर्ष असावे.

निवड प्रक्रिया –
उमेदवाराला 10 वी इयत्तेत मिळालेले मार्क आणि आयटीआयमध्ये प्राप्त केलेले मार्क याआधारे मेरिट लिस्ट लागेल आणि योग्य उमेदवाराची निवड करण्यात येईल.

नियुक्ती स्थळ –
मध्य रेल्वेच्या या सर्व पदावरील नियुक्त मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर आणि विविध युनिटमध्ये करण्यात येईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/