BHEL recruitment 2021 : 10 वी पास आणि ITI उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !, जाणून घ्या प्रकिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम – BHEL recruitment 2021: दहावी पास आणि आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) कंपनीने अनेक पदांसाठी भरती सुरू केली आहे. ट्रेड अप्रेंटिसच्या १२० रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. यासाठी पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील पुढे दिला आहे.

महत्त्वाच्या तारखा –
– ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात- १ जानेवारी २०२१
– ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १६ जानेवारी २०२१
– ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची अंतिम तारीख- २३ जानेवारी २०२१

पदांचा तपशील –
पद – ट्रेड अप्रेंटिस
संख्या – १२०
वयोमर्यादा – या पदांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वय २७ निश्चित करण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया – गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

पात्रता – या भरतीशी संबंधित उमेदवाराकडे दहावी उत्तीर्ण तसेच आयटीआयचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

शुल्क – या पदासाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही प्रवर्गातील उमेदवाराला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. फक्त अर्ज भरावा लागणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया – इच्छुक उमेदवारांनी प्रथम अधिकृत संकेतस्थळावर जावे आणि अर्ज ऑनलाईन भरून निर्धारित वेळेत हार्ड कॉपी पुढील पत्त्यावर पाठवावी.
पत्ता – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, खैलार, भेल झांशी, उत्तर प्रदेश – २८४१२०