खुशखबर ! 12 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, केंद्र सरकारला हवेत क्लार्क, डाटा एन्ट्री ऑपरेटर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. व्यवसाय ठप्प असल्याने कंपन्यांनीही नोकरदारांना कामावरुन कमी केले आहे. त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. पण त्यातही आता १२ वी पास झालेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारने विविध मंत्रालयात नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यासंदर्भात कर्मचारी निवड आयोगाने (STC) कंबाईन्ड सेकंडरी लेव्हल एक्झाम 2020 (CHSL) चे नोटिफिकेशन जारी केले असून, अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

या पदांसाठी भरती

SSC द्वारा परीक्षेमार्फत भारत सरकारमधील मंत्रालये आणि विभागात ही भरती केली जाईल.

>> लोअर डिव्हिजन क्लार्क (LDC)
>>ज्युनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट
>> पोस्टल असिस्टंट
>> डाटा एंट्री ऑपरेटर्स

कोण करु शकतील अर्ज ?

देशातील कोणत्याही बोर्डातून बारावी (१०+२) उत्तीर्ण झालेले तरुण या भरती साठी अर्ज करु शकतील.

शुल्क

महिला उमेदवार, दिव्यांग एससी, एसटी आणि माजी कर्मचाऱ्यांना अर्ज शुक आकारले जाणार नाही. इतर उमेदवारांना १०० रुपये शुल्क आकारले जातील.

महत्वाच्या तारखा…

>> ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – ६ नोव्हेंबर २०२०
>> ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम रातीख – १५ डिसेंबर २०२० (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
>> ऑनलाइन फी पेमेंटची अंतिम तारीख – १७ डिसेंबर २०२० (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
>> ऑफलाइन चलन भरण्याची अंतिम तारीख – १९ डिसेंबर २०२० (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
>>चलनसाठी फी पे करण्याची अंतिम तारीख – २१ डिसेंबर

परीक्षा

>> संगणकावरील परीक्षा पहिली – १२ एप्रिल २०२१ ते २७ एप्रिल २०२१
>> संगणकावरील परीक्षा दुसरी – नंतर घोषित करण्यात येईल.

वयाची अटक

उमेदवाराचे वय साधारणपणे १८ ते २७ वर्षे असावे. आरक्षित वर्गसाठी १५ वर्षाची सूट दिली जाईल. ती २७+१५ अशी असेल.

डायरेक्ट लिंक

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा… https://ssc.nic.in/_ga=2.113000580.1202911943.1604740595-763477693.1584512576