रेल्वेमध्ये 10 वी पास उमेदवारांची मेगा भरती, लेखी परिक्षा न देता नोकरी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य रेल्वेमध्ये अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. 2562 अ‍ॅप्रेंटिस पोस्टसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 22 जानेवारी 2020 पर्यंत किंवा त्याआधी अर्ज करू शकतात. उमेदवारासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास असणार आहे. या जाहिरात लिंक बरोबरच उमेदवारांना अर्जाची लिंकही मिळेल.

महत्त्वाच्या तारखा:
मध्य रेल्वे भरती 2020 ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: 23 डिसेंबर 2019
मध्य रेल्वे भरती 2020 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2020

शैक्षणिक पात्रता:
संबंधित विषयातील मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह 10 वी पास किंवा समकक्ष संबंधित विषयातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्रधारक अर्ज करू शकतात.

मध्य रेल्वे भरती 2020 वय मर्यादा:
15 ते 24 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

कशी होणार उमेदवाराची निवड:
अ‍ॅप्रेंटिस पदासाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.

अर्ज कसा करावा:
इच्छुक उमेदवार मध्य रेल्वे भर्ती 2020 साठी ऑनलाईन पद्धतीने 22 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करू शकतात.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://www.rrccr.com/Home/Home या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.