रेल्वेत नोकरीची संधी, ‘ही’ अर्ज करण्याची ‘अंतिम’ तारिख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे भरती बोर्डने (RRB) ने ज्युनिअर इंजिनिअर (JE) आणि डिपो सामुग्री अधीक्षक (DMS) पदांच्या भरतीसाठी 16 सप्टेंबरपासून अर्ज मागवले आहेत. या दोन्ही पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2019 असणार आहे. पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात.

पदांची संख्या – 149
पद – ज्युनिअर इंजिनिअर आणि डिपो सामुग्री अधीक्षक

महत्वाच्या तारखा 
अर्ज करण्याची प्रारंभिक तारीख – 16 सप्टेंबर 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 15 ऑक्टोबर 2019

शैक्षणिक पात्रता 
उमेदवारीची शैक्षणिक योग्यता पदांनुसार वेगवेगळी आहे, त्यासाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन डाऊनलोड करावे.

वयोमर्यादा 
उमेदवारीचे किमान वय 18 वर्ष आणि अधिकतम वय 42 वर्ष असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज 
उमेदवार ऑनलाइन अर्ज भरु शकतात. त्यासाठी उमेदवाराला RRB च्या http://www.rrbcdg.gov.in/ आधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अर्ज केल्यानंतर उमेदवाराने प्रिंट ऑऊट सांभाळून ठेवावी.