RSMSSB Recruitment 2020 : स्टेनोग्राफरच्या 1211 पदांसाठी भरती, 12 वी पास असलेल्यांनी लवकर करा अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. राजस्थान अधीनस्थ व मंत्रालय सेवा निवड मंडळाने स्टेनोग्राफरच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. स्टेनोग्राफरच्या पदांवर निघालेल्या या रिक्त जागेत 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. या रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2020 आहे.

पोस्ट संख्या
आरएसएमएसएसबी भरती अंतर्गत स्टेनोग्राफरची 1211 पदे नियुक्त केली जातील.

शैक्षणिक पात्रता
आरएसएमएसएसबीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, स्टोनोग्राफरच्या पदांसाठी 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी एखाद्या मान्यताप्राप्त बोर्ड / संस्था / विद्यापीठातून बारावी पास असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला संगणक चालविण्याचे ज्ञान देखील असले पाहिजे.

वय श्रेणी
आरएसएमएसएसबीमध्ये स्टेनोग्राफरच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 40 वर्षे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा शिथिल करण्यात येईल. वयाची मर्यादा 01 जानेवारी 2019 पासून मोजली जाईल.

अर्ज फी
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना 450 रुपये फी भरावी लागेल. तर अनुसूचित जाती / जमातीच्या उमेदवारांना 250 रुपये फी भरावी लागेल.

अर्ज कसा करावा
राजस्थानमध्ये स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक व पात्र असणारे उमेदवार 24 सप्टेंबर, 2020 पर्यंत राजस्थान अधीनस्थ व मंत्रालय सेवा निवड मंडळ, rsmssb.rajasthan.gov.in या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत सूचना येथे क्लिक करुन पाहू शकता.